Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : ऊस गाळपात ‘बारामती अॅग्रो’ची आघाडी

Baramati Agro : पुणे जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपात ‘बारामती अॅग्रो’ साखर कारखान्याने आघाडी घेतली असल्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपात ‘बारामती अॅग्रो’ साखर कारखान्याने आघाडी घेतली असल्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली असली तरी हळहूळू साखर कारखाने सुरू झाले होते. जिल्ह्यात उशिराने कारखाने सुरू झाले असले तरी मध्यंतरी ढगाळ वातावरण व पावसामुळे कारखाने काही प्रमाणात गती मंदावली होती. परंतु पुन्हा वेग आला आहे.

यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीमुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या आहेत. चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र, ऊस शेतात जुलैपासून पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे.

जिल्ह्यातील पूर्व व उत्तर भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दीड लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. शासनाने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. सध्या सुरू झालेल्या कारखान्यामध्ये सहकारी ९ व खासगी ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख १७ हजार टन एवढी आहे.

आत्तापर्यंत सुरू झालेल्या १४ कारखान्यांनी ५२ लाख ४७ हजार ३५५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४५ लाख ३७ हजार १२९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ८.६५ टक्के एवढा आहे. श्री. सोमेश्‍वर साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा १०.९१ टक्के एवढा साखर उतारा आहे.

गाळपामध्ये बारामती अॅग्रोने आघाडी

- कारखान्याने केले १० लाख २७ हजार ४३७ टन उस गाळप.

- त्यातून ७ लाख ५९ हजार ६७० क्विंटल साखरेचे उत्पादन.

- साखर उतारा सरासरी ७.३१ टक्के एवढा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT