Banana Seedling  Agrowon
ॲग्रो विशेष

Tissue Culture Banana : करमाळ्यात टिश्यू कल्चर केळी रोपांची चढ्या दराने विक्री

Banana Seedling : करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रासह माढा, माळशिरस, पंढरपूर, इंदापूर येथे निर्यातक्षम केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे.

Team Agrowon

Solapur News : करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रासह माढा, माळशिरस, पंढरपूर, इंदापूर येथे निर्यातक्षम केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या रोपांमध्ये जाणीवपूर्वक ‘कृत्रिम’ तुटवडा निर्माण केला जात आहे. तसेच प्रतिरोप १० ते १५ रुपयांने चढ्या दराने रोपांची खरेदी करावी लागत आहे.

काही विक्रेत्यांकडून नामांकित रोपवाटिकेतील रोपांच्या नावाखाली इतर स्थानिक रोपवाटिकेतील रोपांची विक्री सुरू आहे. अशा स्थानिक रोपवाटिकेतील रोपांची निर्मिती करताना विशेष काळजी न घेतल्याने केळी बागा लवकर रोगास बळी पडतात.

परिणामी, मालाचा दर्जा ही राखला जात नाही. एका बाजूला केळीला उच्चांकी दर मिळत असताना, रोप विक्रेत्या कंपन्यांच्या उदासीनतेमुळे व अधिकृत डीलर यांच्याकडून होत असलेल्या पिळवणुकीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर लागवड करता येत नाही. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ठिबकसह अन्य साहित्याची सक्ती

रोपांच्या खरेदीसाठी विक्रेत्यांकडे गेल्यावर आमचे ठिबक घ्या, खते घ्या. निश्चित किंमतीत रोपे दिली जातील, अशी अट घातली जात आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लढवून शेतकऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे. इच्छा नसतानाही ठिबक संच किंवा निर्धारित किमतीपेक्षा जास्त पैसे केळी रोपांसाठी मोजावे लागत आहेत.

केळी रोपे विक्रेत्यांवर कृषी विभागाचा परवाना बंधनकारक करावा. रोपासोबत कंपनीची खरेदी पावती देणे बंधनकारक करावे. त्यावर कंपनीचा संबंधित वाणाचा उल्लेख असावा, बुकिंग पद्धत ऑनलाइन असावी, ज्या शेतकऱ्यांना रोपे विकली आहेत, त्याची माहिती कंपनीने संबंधित विभागातील कृषी विभागास देणे बंधनकारक असावे. गैरप्रकार व रोपविक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन स्तरावरून कार्यवाही करावी.
-रणजित शिंदे, केळी उत्पादक, वाशिंबे, ता. करमाळा
रोप विक्रेत्यांना कृषी विभागाचा परवाना बंधनकारक करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. चढ्या दराने रोपांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची नावे कृषी विभागास द्यावीत, अशा लोकांवर कारवाई करू.
-शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पावसाचा जोर कमी होणार; आज विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Ayurvedic Vegetables: औषधी, पोषणमूल्य असणाऱ्या रानभाज्या

Water Shortage: सातपुड्यातील अनेक सिंचन प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा

Orchidaceae Species: दुर्मीळ ‘पोरपॅक्स जर्डोनियाना’ प्रजातीची नोंद

Moong Crop Loss: पावसाने खानदेशात मूग पिकाची हानी

SCROLL FOR NEXT