Banana Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Banana Damage: खानदेशात केळी बागा होरपळू लागल्या

Heatwave Impact on Crop: खानदेशातील जळगाव, चोपडा, रावेर भागात अति उष्णतेमुळे केळी बागांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची घट होत असून, बागांचे तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे चित्र आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळी बागांना अति उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाली असून, कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. शेतकरी बागा वाचविण्याची धडपड करीत आहेत.

खानदेशातील लहान व मोठ्या अशा सर्वच बागांना अति उष्णतेचा फटका बसला आहे. मागील सहा ते सात दिवस कमाल तापमान सतत वाढले असून, चोपडा, जळगाव, यावल, रावेर, जामनेर भागातील काही मंडलांत ४५ ते ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सर्वत्र मागील चार दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत होते.

उष्णतेमुळे लहान व निसवलेल्या, काढणीवर येत असलेल्या बागांत रोज सहा ते आठ तास सिंचन करावे लागत आहे. कारण बागेत वाफसा, ओलावा कायम ठेवणे आवश्यक आहे. घडांना स्कर्टिंग बॅग किंवा कव्हर लावणे, केळी घडांना केळीच्या वाळलेल्या पानांच्या चुडा करून झाकणे अशी सर्कस शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

अति उष्णतेत बागांत घड सटकण्याची समस्याही वाढली असून, झाडे मोडून पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. बागेत उष्णता किंवा उन्हामुळे कोवळी पाने होरपळणे, झाडांना उष्णतेचा फटका बसणे, अशा समस्याही दिसल्या आहेत. जी झाडे होरपळली आहेत, ती आता उत्पादनक्षम नाहीत. ती फेकावी लागतील.

या होरपळलेल्या झाडांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मागील सात ते आठ दिवसांतील उन्हात बागांचे ३५ टक्के नुकसान खानदेशात झाले आहे. खानदेशात केळी बागांचे किमान ५०० ते ६०० कोटींचे नुकसान झाले असून, हे नुकसान शेतकरी सद्यःस्थितीत भरून काढू शकत नाहीत. बागांवर एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च निसवणीपर्यंत केला जातो. काही शेतकरी किमान ७० ते ८० हजार रुपये एकरी खर्च करतात. हा खर्चही या नुकसानीमुळे वाया गेल्याची स्थिती अनेक भागांत आहे.

मोठ्या क्षेत्राला फटका

खानदेशातील किमान २५ ते ३० हजार हेक्टरवरील केळी बागांना या अतिउष्णतेचा फटका बसला आहे. केळीचे दाट क्षेत्र असलेल्या व नैसर्गिक वारा अवरोधक, उष्णतेपासून बचावासंबंधी कार्यवाही केलेल्या भागांतील बागांची स्थिती बरी आहे. सर्वाधिक फटका जळगाव, चोपडा, तळोदा, अक्कलकुवा, जामनेर, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर आदी भागांत बसला आहे. हलक्या, मुरमाड क्षेत्रातील केळी बागा व्यवस्थित सिंचन करूनही होरपळल्या आहेत.

तापमान सध्या सरासरीपेक्षा अधिक आहे. रोज तापमान वाढत असून, लहान व मोठ्या केळी बागांना फटका बसत आहे. बागांभोवती नैसर्गिक वारा अवरोधक, हिरवी नेट, लहान केळी झाडे, कंद किंवा रोपांनजीक धैंचा, ताग असल्यास तापमान नियंत्रणास मदत होते. सिंचनाबाबत काटेकोर कार्यवाही आवश्यक आहे.
महेश महाजन, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र पाल, ता. रावेर, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT