Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation: खानदेशात केळी लागवड रखडली

Khandesh Agriculture Update: खानदेशात यंदा जून महिन्यात केळी लागवडीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मार्च व एप्रिलमध्ये चांगली लागवड झाल्यानंतरही, जून-जुलैमध्ये उष्णता, वारे, गारपीट आणि ‘सीएमव्ही’ रोगाच्या भीतीने शेतकरी लागवड टाळत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: मार्च व एप्रिलच्या तुलनेत मे व जूनमधील केळी लागवड खानदेशात अल्प दिसत आहे. रोपांसह कंदांची लागवड या दोन्ही महिन्यांत कमी आहे. अनेक शेतकरी रोपे मिळत नसल्याने लागवड करू शकलेले नाहीत.

केळी कंद पुरेसे आहेत. परंतु जून व जुलैत लागवडीच्या केळी बागांची काढणी एप्रिल ते जून या कालावधीत होते. एप्रिल ते जून या कालावधीत खानदेशात कमाल तापमान ४५ पर्यंत पोहोचते. तसेच वेगाचा वारा, गारपिट या समस्या असतात. तापमानात केळी बागा या कालावधीत वाचविताना नाकीनऊ येतात. यामुळे या दोन्ही महिन्यांतील केळी कंदांची लागवड कमी दिसत आहे. पुढील महिन्यातही अशीच स्थिती राहील, असे दिसत आहे.

खानदेशात जूनमधील केळी लागवडीचे आकडे कमी दिसत आहेत. या महिन्यात खानदेशात मिळून १५ हजार हेक्टरवरदेखील केळी लागवड झालेली नाही. तुलनेत मार्च व एप्रिलमध्ये अनेकांनी केळी रोपे व कंदांची लागवड केली. कंद, रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकात धैंचाची लागवड केली. सिंचनाबाबत काटेकोर व्यवस्थापन केले. तसेच अन्य उपायही केले.

यामुळे अनेकांच्या केळी बागा जोमात आहेत. जूनमध्ये तापमान कमी झाले. पुढे पाऊस येईल, अशीही अपेक्षा आहे. पण या महिन्यातील केळी लागवड शेतकऱ्यांनी टाळली आहे. या महिन्यात फक्त एरंडोल, पाचोरा, तळोदा, यावल, जळगाव आदी भागांत काही शेतकरी केळी कंद व रोपांची लागवड करीत आहेत. रावेर, यावलमध्ये केळी रोपांची लागवड काही शेतकरी करीत आहेत. परंतु केळी लागवडीत या महिन्यात फारसा प्रतिसाद नसल्याची माहिती आहे.

खानदेशात मृग बहर केळी लागवड अधिक असायची. परंतु अलीकडे मृग बहराऐवजी मार्च, एप्रिल आणि ऑगस्टमध्ये केळी लागवड अधिक होवू लागली आहे. यामुळे मृग बहर केळीला आता अर्ली मृग बहर व उशिराची मृग बहर केळी म्हणून ओळखले जात आहे.

खानदेशात अर्ली व उशिराची मृग बहर केळीची सुमारे ६० ते ७० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. तर कांदेबाग किंवा ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये लागवडीच्या केळीची सुमारे ४० ते ४२ हजार हेक्टरवर लागवड होईल.

‘सीएमव्ही’चा धोका

केळी रोपांची मागणी काही भागात आहे. पण काही भागात किंवा रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारातील शहादा, धुळ्यातील शिरपुरात अनेक जण केळीच्या उतिसंवर्धित रोपांची लागवडही जूनमध्ये टाळत आहे. कारण जून व जुलैत लागवडीच्या केळी रोपांवर पावसाळ्यात कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) आल्याचे अनुभव अनेकांना आहे. या विषाणूमुळे अनेकांच्या केळी बागा फेकाव्या लागल्या होत्या. यामुळे या महिन्यातील केळी रोपांची लागवडही अनेकांनी टाळली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT