Bamanoli Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Bamanoli Dam : बामणोली धरण शेतकऱ्यांसाठी वरदान

Water Stock Update : रसायनीतील जांभिवली येथील बामणोली धरण पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.

Team Agrowon

Bamanoli Dam Update : रसायनी : रसायनीतील जांभिवली येथील बामणोली धरण पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. दुबार हंगाम संपल्यानंतरही धरणात जवळपास ३५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. या पाण्याचा पशु-पक्षी, गुरांना उपयोग होत आहे.

जांभिवली गावातील घेरा माणिकगडाच्या पायथ्याशी सुमारे ३९ वर्षांपूर्वी बामणोली धरण बांधण्यात आले. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आदी गावे आणि लगतच्या वाडी-वस्‍तीतील शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे. खरीप हंगामातील भात पिकानंतर शेतकरी रब्बी हंगामात भात पिकाबरोबर भाजीपाल्याचे पीक घेऊ लागले आहे.

सिंचनाचे खात्रीचे साधन मिळाल्याने जांभिवली परिसरातील शेती चांगलीच बहरली आहे. बारा महिने जनावरांना हिरवा चारा मिळू लागल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. दोन वर्षीपूर्वी भात, भाजीपाला पिकांचा दुबार हंगाम संपल्यानंतर जॅकवेलचे काम करण्यात आल्‍याने धरणातून गळती कमी झाली आहे.

दुबार शेतीसाठी सोडलेले पाणी हंगाम संपल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात आले आहे. सध्या बामणोली धरणात साधारण ३५ टक्के साठा शिल्लक आहे.
विजय काकडे, कालवा निरीक्षक
धरणाच्या जॅकवेलचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी गळती कमी झाली आहे. हंगाम संपल्यानंतरही धरणात पाणी शिल्लक राहते. आता सवने गावातील शेतकऱ्यांना दुबार हंगामातील पिकांना पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी नादुरुस्त झालेल्या पाटाची दुरुस्ती करण्यात यावी आणि कालव्याद्वारे परिसरातील शेतीला पाणी द्यावे
भगवान देशमुख, शेतकरी, सवने

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT