Balloon Bunds Agrowon
ॲग्रो विशेष

Balloon Bunds : बलून बंधारे प्रकल्पांचा खर्च वाढला

Water Storage : जिल्ह्यातील निम्म्या भागाची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीवर प्रस्तावित बलून बंधारे प्रकल्प गेले २४ ते २५ वर्षे फक्त चर्चेत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील निम्म्या भागाची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीवर प्रस्तावित बलून बंधारे प्रकल्प गेले २४ ते २५ वर्षे फक्त चर्चेत आहे. मान्यता, प्रस्ताव यापुढे काहीच होताना दिसत नाही. या प्रकल्पास राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याने अडचण आहे. नव्या सरकारने हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱी करीत आहेत.

तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री एम. के. अण्णा पाटील यांनी सुमारे २२ वर्षांपूर्वी या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला. एनडीए सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी याबाबत काम केले. राज्यात मागील आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनीदेखील या प्रकल्पासंबंधी पाठपुरावा केला.

यानंतर जळगाव लोकसभा क्षेत्राचे तत्कालीन खासदार ए. टी. पाटील यांनी याबाबत काम केले. माजी खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला. बैठका घेतल्या. केंद्रीय प्रकल्प म्हणून हा प्रकल्प मंजूर झाला. तत्कालीन केंद्रीय पाटबंधारे मंत्री उमा भारती यांनी या प्रकल्पाबाबत हवाई पाहणीदेखील केली.

यानंतर मंजुऱ्या, प्रस्ताव, डीपीआर यावर काम झाले. केंद्राने सर्व मंजुऱ्या दिल्या. राज्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत अनेक आश्वासने दिली. निवडणुकीच्या प्रचारात बलून बंधारे प्रकल्पाबाबत सर्वच आश्वासने देत आले आहेत. पण निधी व काम याबाबत शासनदरबारी दखल घेतली जात नाही.

११०० कोटींवर खर्च शक्य

गिरणा नदीवर सात बलून बंधारे प्रस्तावित असून, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव, धरणगाव या भागातील मोठे क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल. सुमारे चार हजार ते ४१०० हेक्टर क्षेत्रास लाभ होईल. टंचाई दूर होईल. तसेच आता १४०० कोटी रुपये निधी या प्रकल्पास लागणार आहे.

पण प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झालेला नसल्याने त्याचा खर्च पुढे वाढणार आहे. प्रकल्प रेंगाळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता आघाडी व भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा फटका या प्रकल्पास बसत आहे. गिरणा पट्टा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात कुठलाही मोठा प्रकल्प नाही. यामुळे बलून बंधाऱ्यांची आवश्यकता या भागात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT