Agriculture Day 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Day 2025: बाळापूर पंचायत समितीत कृषिदिनी कार्यक्रम

Vasantrao Naik: माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. एक) बाळापूर पंचायत समितीत कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Team Agrowon

Akola News: माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. एक) बाळापूर पंचायत समितीत कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष रवींद्र पोहरे यांनी वसंतराव नाईक यांचे शेतीतील योगदान सांगतांना त्यांनी कृषिक्रांतीला नवरुप दिल्याचे प्रतिपादन केले. तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी (कै.) वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी राजेश खुमकर, सहायक गटविकास अधिकारी नाना पजई, बाळापूर तालुका पत्रकार संघाचे रमेश ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी राहुल सिरसाठ, विस्तार अधिकारी पी. जी. नाकट, कृषी विस्तार अधिकारी कल्याणी बर्डिया, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.एम. शेगोकार आदींची उपस्थिती होती.

गटविकास अधिकारी खुमकर यांनी शेतकऱ्यांना वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची सविस्तर माहिती दिली. या वेळी तालुक्यातील उत्कृष्ट शेती व पूरक व्यवसाय करणारे शेतकरी मोखा येथील रामकृष्ण तायडे, बोराळा येथील गजानन टाले, वाडेगावचे शिवा राहुडकर,

दधमचे उल्हास खुळे आणि व्याळा येथील ‘व्यालेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी’च्या संचालिका सरिता कोल्हे यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व कृषिविषयक पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कल्याणी बर्डिया यांनी केले. तर पुरुषोत्तम नाकट यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT