Dr. K. V. Prasad Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticides Use : कीटकनाशकांचा संतुलित, सुरक्षित वापर गरजेचा : डॉ. प्रसाद

Director of Flower Research Directorate Dr. K. V. Prasad : रोपवाटिका उद्योग विस्तारत असताना, या उद्योगासाठी लागणाऱ्या निविष्ठा आणि कीटकनाशकांचा संतुलित आणि सुरक्षित वापर होणे गरजेचे आहे.

Team Agrowon

Pune News : शोभिवंत फुलांच्या आणि रोपांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोपवाटिका उद्योग विस्तारत असताना, या उद्योगासाठी लागणाऱ्या निविष्ठा आणि कीटकनाशकांचा संतुलित आणि सुरक्षित वापर होणे गरजेचे आहे.

यासाठी रोपवाटिकाचालक शेतकरी आणि कामगारांना शास्त्रोक्त पद्धतीने कीटकनाशके वापरातून कुशल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.

‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ याअंतर्गत पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने सहकारी शेतकरी फूल नर्सरी गट आणि चिंतामणी मित्र मंडळाच्या वतीने ‘शोभेच्या रोपवाटिका कामगारांसाठी शेत सुरक्षा हाताळणी प्रशिक्षण’ शिबिराचे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालयाचे डॉ. कौशिक बॅनर्जी, द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. विजय महाजन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चरच्या कृषी विभागाचे प्रमुख शंतनू जगताप उपस्थित होते.

या वेळी पुष्पसंशोधन संचालनालयाचे वरिष्ठ संशोधक डॉ. गणेश कदम, डॉ. नरेंद्र गजभिये यांनी नर्सरी उद्योगातील समस्या आणि निराकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी शेतकऱ्यांना वनस्पती संरक्षणासाठी सुरक्षा किट दिली गेली, तसेच त्यांना सुरक्षितता उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT