Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Free Ration Scheme : मोफत गहू, तांदळासोबत मिळणार बाजरी ; युपी सरकारचा निर्णय

Bajara On Ration : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) देशातील गरीबांसाठी मोफत अन्नधान्य देण्याची योजना केंद्र सरकार राबवत आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) देशातील गरीबांसाठी मोफत अन्नधान्य देण्याची योजना केंद्र सरकार राबवत आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांनी वाढविण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे देशातील जवळपास ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षांसाठी रेशनवर मोफत अन्नधान्य मिळणार आहे.

अशातच आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या रेशनमध्ये बाजारीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युपीतील लोकांना रेशनवर गहू तांदळासह बाजरीही मिळणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय युपीच्या अन्न विभागाने जारी केला आहे.

याअंतर्गत पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून रेशनवर मिळणाऱ्या गहू आणि तांदळाचे प्रमाण कमी करून त्यामध्ये बाजरीचा समावेश करण्यात येणार आहे. भरडधान्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतून हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या महिन्याच्या रेशनमध्ये बाजरी मिळण्यास सुरूवात होणार आहे.

गहू, तांदळाचे प्रमाण कमी करणार

फेब्रुवारी २०२४ पासून रेशनवरील मोफत मिळणाऱ्या गहू, तांदळाचे प्रमाण कमी करून त्यात बाजरीचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील लाभार्थ्यांना दरमहा ३५ किलो धान्य देण्यात येते.

यात १४ किलो गहू आणि २१ किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र नविन आदेशानंतर फेब्रुवारीपासून १४ किलो गहू, ११ किलो तांदूळ आणि १० किलो बाजरी देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT