Jalgaon News : खानदेशात बाजरीची मळणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र किंचित वाढले होते. अनेकांनी कांदा व मका लागवड कमी करून पेरणी केली. उशिराच्या बाजरीची मळणी सुरूच आहे. अनेकांनी चाऱ्यासाठी बाजरीची पेरणी केली. यामुळे पेरणी काहीशी वाढून सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत गेली होती.
बाजरीची पेरणी खानदेशात साडेसहा हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु अनेकांनी गहू पेरणी कमी केली. चारा व धान्यासाठी बाजरीची पेरणी करण्यास शेतकरी पसंती देत होते. यामुळे बाजरीची पेरणी काहीशी वाढणार असा अंदाज होता. केळी पट्ट्यातही बेवडसाठी बाजरी पेरणी करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा भागात केळीची काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या बागांतही ठिबकवर बाजरीची पेरणी झाली होती. तर रावेर, मुक्ताईनगर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात केळी व इतर पिकांना बेवड, जमीन सुपीकता यासाठी बाजरीची पेरणी करण्यात येते.
काळ्या कसदार जमिनीत फक्त चार वेळेस बाजरीचे सिंचन करावे लागते. ठिबक असल्यास अधिकचे पाणी लागत नाही. बाजरीचे दरही २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे टिकून आहेत. चाऱ्यासही मागणी आहे. गहू, संकरित ज्वारी आदींची पेरणी कमी होती. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बाजरी मळणीस वेग आला. पेरणी फेब्रुवारीतही झाली होती. पेरणी फेब्रुवारीत १५ ते २० दिवस सुरू होती.
अनेक शेतकरी थंड वातावरणात पेरणी टाळतात. कारण या काळात उगवणीवर परिणाम होतो, असे शेतकरी मानतात. यामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाल्यानंतर बाजरी पेरणीला वेग आला होता. या उशिराच्या बाजरीची मळणी सुरूच आहे. काबींची बाजरी अजून मळणीविना शेतात कापून पडली आहे. मजूर मिळत नसल्याने अडचणदेखील आहे. त्यात पावसाळी वातावरण तयार होत आहे.
जळगावात अधिकची पेरणी...
बाजरीची सर्वाधिक सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात होती. . तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर बाजरी होती. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबारात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी होती. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीत आघाडीवर आहे. या भागात मळणी पूर्ण होत आली आहे. पण पावसाने अनेकांच्या बाजरीची हानी मे महिन्यात झाली. कारण मे मध्ये ६ मे ते ३० मे या दरम्यान विविध भागात पाऊस, वादळी पाऊस अशी स्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.