Maharashtra Politics agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : बच्चू कडूंची अनोखी धुळवड; ५ किमी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या रंगाने लिहल्या, सरकारचा केला निषेध

Bachchu Kadu : राज्यभर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वेगळ्या पद्धतीने धुलीवंदन साजरे केले आहे.

sandeep Shirguppe

Farmers Protest Against Government : राज्यभर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वेगळ्या पद्धतीने धुलीवंदन साजरे केले आहे. अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा येथे बच्चू कडूंनी तब्बल ५ किमी रस्ते रंगवत शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. याचबरोबर कडू यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली.

सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याची नाराजी व्यक्त करत बच्चू कडू म्हणाले की, ''रंगपंचमी हा उत्सव आहे. पण यातून आम्ही सरकारकडे विविध मागण्याचे आवाहन केले आहे. सरकारने रंगाचं राजकारण करून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे. या सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र, कर्जमाफी दिलेली नाही. दुसरीकडे शेतमालाला भावही मिळत नसल्याची स्थिती आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय करण्याचं काम सरकारनं केलं आहे.'' असे बच्चू कडू म्हणाले.

''बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेत शेतकरी पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. आज शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि तुरीला भाव नाही. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण या अर्थसंकल्पात त्याचा साधा उल्लेखही केलेला नाही. दिव्यांगांचे चार महिन्यापासून पैसे अद्यापही मिळालेले नाही, खरं तर सरकार या सगळ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे'', असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

''या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी यावर्षी आम्ही ५ किलोमीटर रस्ता रंगून शासनाला एक प्रकारचा इशारा दिला आहे. सरकारनं आमच्या अंगावर खुनाचा रंग चढवला आहे. लाल रंग त्यांनी आमच्या कपाळाला लावला आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बनलीय शेतकरी आणि मजुरांचा रंग फिक्का पडला आहे. त्यांच्या आयुष्यातला रंग उडाला आहे'', अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी केली.

बच्चू कडू यांची काँग्रेसवर टीका

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर टीका केली. "नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसचं सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही. काँग्रेसचे २० आमदार आहेत, तर १ तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे". अशी खरमरीत टीका नाना पटोलेंनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT