Bachchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Bacchu Kadu Disqualified: जिल्हा बॅंक अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र

District Bank Controversy: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीच्या प्रकरणात शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: शासकीय कामात अडथळा आणि मारहाणप्रकरणी नाशिक विशेष न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावल्याचा हवाला देत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. श्री. कडू यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भातील आंदोलन स्थगित केल्यानंतर तत्काळ या संबंधीचे आदेश देण्यात आल्याने हा प्रकार विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासारखा आहे, असा आरोप केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्यापूर्वीच बच्चू कडू हे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते. विरोधी गटातील दोन संचालकांना फोडून त्यांनी हे पद मिळविल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने विरोधी गटातील सदस्यांकडून त्यांच्याविरोधात आर्थिक अनियमिततेचे आरोप जिल्हा निबंधकांकडे (सहकारी संस्था) लेखी स्वरूपात करण्यात आले होते. त्याची दखल घेत सातत्याने त्यांची चौकशी झाली.

परंतु बॅंक प्रशासनाला निबंधक किंवा विभागीय सहनिबंधक यांच्याकडून प्राप्त नोटीस, पत्र न स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच अनेक प्रकारच्या चौकशा प्रलंबित असल्याचा आरोप विरोधी गटातील संचालकांकडून केला जात आहे. अशातच नाशिक येथील एका प्रकरणात बच्चू कडू यांच्यावर सकरवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शासकीय कामात अडथळा आणण्याबरोबरच त्यांच्यावर मारहाण केल्याची त्यांच्याविरोधात तक्रार होती. या प्रकरणी नाशिक येथील विशेष (आमदार-खासदार) न्यायालयाने त्यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी मुंबई

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

याचिका दाखल केली आहे. असे असतानाच विभागीय सहनिबंधक यांनी त्यांच्या अधिकारानुसार बच्चू कडू यांना बॅंकेच्या अध्यक्षपदासह संचालक पदावरून अपात्र ठरविले आहे. ही जागा रिक्‍त ठरवून त्यांना पुढील पाच वर्षांच्या मुदतीचा कालावधी संपेपर्यंत समिती सदस्य, संचालक म्हणून पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास देखील अपात्र ठरविण्यात आले आहे.

आंदोलन केल्याच्या सुडातून हा सर्व प्रकार घडला आहे. नाशिकच्या संबंधित प्रकरणात न्यायालयाने स्थगन आदेश दिला आहे. त्यानंतर देखील अपात्रतेचा आदेश काढण्यात आला, हे अनाकलनीय आहे. या संबंधाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली जाईल. विशेष म्हणजे ज्याला अपात्र ठरवले त्याला आदेशाची प्रत न देता माध्यमांपर्यंत ही पोहोचविण्यात आली, त्यावरूनच सारे स्पष्ट होत आहे. भरीस भर म्हणजे आंदोलन संपल्यानंतर हे सुडाचे राजकारण खेळण्यात आले. आज काढलेल्या आदेशाकरिता मागच्या तारखेचा वापर करण्यात आला.
बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
आदेशानुसार बच्चू कडू यांना जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र हा आदेश मे महिन्यातील असताना आतापर्यंत का दडविण्यात आला याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. कारण मी नुकताच रुजू झालो असून आदेश यापूर्वीच्या सहनिबंधकांनी पारीत केला आहे.
गौतम वर्धन, विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था), अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT