Bacchu Kadu Meets Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Bacchu Kadu and Sharad Pawar : बच्चू कडू यांनी घेतली शरद पवार यांची पुण्यात भेट

Sharad Pawar and Bacchu Kadu Meeting : १७ प्रश्‍नांबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी भेट घेऊन चर्चा केली.

Team Agrowon

Pune News : सद्यःस्थितीत धर्म-जातीच्या मुद्यांवर चर्चा होते. मात्र शेतकरी, कामगार, दिव्यांग, मजूर, महिला, प्रकल्पग्रस्त, शहीद जवानांच्या कुटुंबांच्या समस्यांवर कोणी बोलत नाही. हे प्रश्‍न समाजाच्या आणि राजकीय दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहेत.

हे प्रश्‍न चव्हाट्यावर येऊन राजकीय व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत, अशा १७ प्रश्‍नांबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती श्री. कडू यांनी माध्यमांना दिली.

आमदार कडू यांनी शनिवारी (ता.१०) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील मोदी बाग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

आमदार कडू म्हणाले, ‘‘पवार यांच्या सोबतची भेट पूर्वनियोजित होती. समाजाच्या अति दुर्लक्षित घटकांच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. यासाठी मी १७ प्रश्‍नांवर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शेतकरी, कामगार, दिव्यांग, मजूर, महिला, प्रकल्पग्रस्त, शहीद जवानांच्या कुटुंबांच्या समस्या, दिव्यांग मंत्रालयाला देण्यात येणारा निधी, दिव्यांग विद्यापीठ, दिव्यांगांना महिन्याला ६ हजार रुपये द्यावेत आदी विविध विषयांवर चर्चा झाली.’’

या सर्व मुद्द्यांवर राजकीय व्यासपीठावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र सध्या जात, धर्मावर अधिक चर्चा होत असून, यामध्ये सर्वसामान्य आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्‍न मागे पडले आहेत. या प्रश्‍नांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. सामाजिक दबाव वाढला पाहिजे, यासाठी ही भेट असल्याचेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT