Baby Whale Fish  Agrowon
ॲग्रो विशेष

Baby Whale : ४० तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपयश, अखेर बेबी व्हेलचा मृत्यू

Baby Whale Fish : गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूत सुमारे चार टन वजनाचा बेबी व्हेल सोमवारी अडकला. तब्बल 40 तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला पाण्यात सोडण्यात आले. परंतू गुरुवारी सकाळी तो किनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळून आला.

Swapnil Shinde

Ratnagiri News : रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी ३५ फूट लांब बेबी व्हेल मासा अडकला. तब्बल ४० तासांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी त्या पुन्हा समुद्रात ढकलण्यात आले. परंतु बुधवारी तो मृत अवस्थेत आढळून आला.

गणपुतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर सोमवारी सुमारे चार टन वजनाचा बेबी व्हेल मासा आढळून आला. समुद्राच्या ओहोटीमुळे तो किनाऱ्यावरील वाळूत अडकला होता. पर्यटक आणि स्थानिक लोकांना व्हेल मासा जखमी अवस्थेत दिसला.

स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तात्काळ पशुवैद्यकांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व्हेलला जिवंत ठेवण्यासाठी द्रव दिले. त्यानंतर रत्नागिरी पोलीस, तटरक्षक दल आणि इतर प्राधिकरणांना बचाव कार्य सुरू करण्यात आले.

मंगळवारी रात्री टगबोट आणून या व्हेलला जाळे लावण्यात आले. भरतीच्या वेळी प्रशासन आणि स्थानिक लोकांनी या व्हेलला पाण्यात ढकलण्यास सुरुवात केली. त्यानंतर व्हेलनेच खोल पाण्याकडे सरकण्याचा प्रयत्न केला.

अनेक तासांच्या सततच्या बचावकार्यानंतर बुधवारी सकाळी व्हेल बाळाला टगबोटीने 7 ते 8 नॉटिकल मैल समुद्रात नेण्यात आले. येथील नैसर्गिक अधिवासात परतल्यावर, बेबी व्हेलने जाळे तोडले त्यानंतर त्याने स्वतःच पोहायला सुरुवात केली. यानंतर तो समुद्राच्या खोल खोलवर गेला.

सर्वांनी सुटकेचा श्वास घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा व्हेल मासा पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर आला. हा मासा जखमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. गुरुवारी सकाळी तो मृत अवस्थेत आढळल्याने त्याला वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री

Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा

Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती

Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

SCROLL FOR NEXT