Aayushman Bharat Agrowon
ॲग्रो विशेष

Aayushman Scheme : साडेसात लाख लाभार्थींकडे गोल्डन कार्ड

Aayushman Bharat Scheme : केंद्र व राज्य सरकारच्या आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतून प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे गोल्डन कार्ड आवश्यक आहे.

Team Agrowon

Solapur News : केंद्र व राज्य सरकारच्या आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतून प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी लाभार्थींकडे गोल्डन कार्ड आवश्यक आहे.

गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक तीन लाख २९ हजार आयुष्मान कार्ड सोलापूर जिल्ह्याने लाभार्थींना दिले असून आतापर्यंत सात लाख ३५ हजार लाभार्थींनी कार्ड काढले आहेत. राज्यात तीन महिन्यात एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढले असून त्यात सोलापूर जिल्हा अव्वल आहे.

प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत जनआरोग्य योजना’ आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होणार आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात.

दुसरीकडे राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून तीन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत होते. आता या दोन्ही योजना एकत्र केल्या असून दोन्ही योजना मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येत आहे.

त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे ११ लाख ५९ हजार ३५८ तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ११ लाख ८८ हजार १९७ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील एकूण २३ लाख ४७ हजार ५५ लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड आरोग्य विभागामार्फत दिले जाणार आहे. आतापर्यंत सात लाख ३५ हजार लाभार्थींनी कार्ड काढले आहे.

ग्रामपंचायतीतही कार्ड काढण्याची सोय

जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून त्यावर रुग्णाला जिल्ह्यातील ५१ रुग्णालयांमध्ये पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. लाभार्थींना आपल्या मोबाइलमधूनही कार्ड काढता येते.

त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्र तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने व योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांच्या मदतीने देखील कार्ड काढता येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT