Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Use : रासायनिक खतांचा सरासरी वापर १ लाख टनांवर

Urea Fertilizer : यंदाच्या खरीप हंगामात सोमवार (ता. २९)पर्यंत विविध ग्रेडची मिळून एकूण ९३ हजार १६७ टन रासायनिक खते विक्री झाली आहेत. ५५ हजारांवर टन खते शिल्लक होती.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात वर्ष २०१९ पर्यंतच्या रासायनिक खतांच्या सरासरी वापराच्या तुलनेत २७ हजार ७६९ टनांनी वाढ होऊन २०२० ते २०२२ या तीन वर्षांत सरासरी वापर १ लाख ९६९ टन झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोमवार (ता. २९)पर्यंत विविध ग्रेडची मिळून एकूण ९३ हजार १६७ टन रासायनिक खते विक्री झाली आहेत. ५५ हजारांवर टन खते शिल्लक होती.

२०१७ ते २०१९ कालावधीतील परभणी जिल्ह्यातील रासायनिक खतांचा वापर सरासरी ७३ हजार २० टन होता. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी २०२२ मध्ये विविध मोहिमा आखण्यात आल्या. त्यात जमीन आरोग्य पत्रिका सुपीकता निर्देशांकावर आधारित खतांचा वापर, बियाण्यास जैविक खतांची प्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचे बियाणे वितरित करणे, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उसाचे पाचट कुजविणे, कंपोस्ट, गांडूळ खते तयार करून वापर करणे यांचा समावेश होता.

परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा अधिक वापर केला जात असल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी वापरात वाढ झाली आहे. खरिपासाठी (एप्रिल ते सप्टेंबर) कृषी आयुक्तालयाकडून परभणी जिल्ह्याला विविध ग्रेडच्या १ लाख ३७ हजार ४०० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर झाला. त्यात युरिया ३६ हजार २०० टन, डीएपी २४ हजार ४०० टन, पोटॅश-एमओपी ३ हजार १०० टन, सुपर फॉस्फेट १६ हजार टन, संयुक्त खते-एनपीके ५६ हजार ७०० टन या खतांचा समावेश आहे. जूनसाठी मंजूर खतसाठ्यांमध्ये युरिया ८ हजार ३२६ टन, डीएपी ७ हजार ६२० टन, पोटॅश ७१३ टन, एनपीके १५ हजार ८७६ टन, सुपर फॉस्फेट ४ हजार ८० टन या खतांचा समावेश आहे.

जुलैमध्ये आजवर ९४ हजार ८० टन खतांचा पुरवठा झाला. तर यंदा १ एप्रिलपासून एकूण ८३ हजार २८४ टन खतांचा पुरवठा झाला. त्यात युरिया २६ हजार ६१६ टन, सुपर फॉस्फेट १० हजार ९६० टन, पोटॅश १ हजार ९९ टन, डीएपी ११ हजार ६६९ टन, एनपीके ३४ हजार १५२ या ग्रेडच्या खतांचा समावेश आहे. ३१ मार्च अखेरचा ६५ हजार ७७८ टन व यंदाच्या हंगामात पुरवठा झालेला ८३ हजार २८४ टन मिळून एकूण १ लाख ४९ हजार ६० टन खतसाठ्यातून सोमवार (ता. २९)प र्यंत ९३ हजार १६७ टन खतांची विक्री झाली.

परभणी जिल्ह्यातील खत विक्री स्थिती (टनांत)

खताचा प्रकार एकूण साठा विक्री शिल्लक

युरिया ४५०४९ २७४६६ १७५८२

सुपर फॉस्फेट १७६३४ ११८२५ ५८०८

पोटॅश १८८० ११३३ ७४७

डीएपी १७६३६ १३१७५ ४४६०

एनपीके ६६८५९ ३९५६५ २७२९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT