Dairy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Milk Organization : कोल्हापुरातील ७५३ दुग्ध संस्थांवर प्राधिकृत अधिकारी नियुक्त

Dairy Industry : जिल्ह्यातील ७५३ सहकारी दुग्ध संस्थांनी निवडणुकीसाठी वारंवार मागणी करूनही मतदार याद्या न दिल्यामुळे जिल्ह्यातील ७५३ दुग्ध संस्थांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील ७५३ सहकारी दुग्ध संस्थांनी निवडणुकीसाठी वारंवार मागणी करूनही मतदार याद्या न दिल्यामुळे जिल्ह्यातील ७५३ दुग्ध संस्थांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. पंचवार्षिक निवडणुका लांबल्या नंतर राज्य निवडणूक प्राधिकरणाने जानेवारीत निवडणुका जाहीर केल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वांत पहिली पायरी असलेल्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम स्थानिक दुग्ध संस्थांचे आहे. त्यांच्याकडून या याद्या वेळेत मिळाल्यानंतर दुग्ध विभागाकडून त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो.

यासाठी दुग्ध विभागाकडून जिल्ह्यातील सुमारे ८०० संस्थांना याबाबतची माहिती दिली. काही संस्थांनी तातडीने याद्या दिल्या, काहींची अपूर्ण राहिलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. जिल्ह्यातील ७५३ सहकारी दुग्ध संस्थांनाही अशाच पद्धतीची माहिती पत्राद्वारे देण्यात आली. त्यांच्याकडून मतदार याद्या तयार करण्यासाठी कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत

दुग्ध संस्थांची तालुकानिहाय आकडेवारी

करवीर ११४

कागल ७४

गडहिंग्लज ५८

चंदगड ६०

पन्हाळा ७९

भुदरगड ८६

राधानगरी ९५

शाहूवाडी ७४

शिरोळ ३२

हातकणंगले ३६

लोकसभा निवडणूक, अतिवृष्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया लांबल्या. अखेर जानेवारीत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश झाले. तरीही जिल्ह्यातील ७५३ सहकारी दुग्ध संस्थांनी प्रारुप मतदार याद्या न दिल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे शक्य झाले नाही. वारंवार पत्रे देऊनही संस्थांनी प्रारूप मतदार याद्या न दिल्यामुळे आज प्राधिकृत अधिकारी नेमावे लागले.
- प्रदीप मालगावे, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT