Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance News : दिवाळीआधी पीकविमा अग्रिम देण्याचा प्रयत्न

Dhananjay Munde on Crop Insurance : विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी अग्रिम देण्याचा प्रयत्न असेल,’’ असे आश्‍वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Team Agrowon

Nagar News : ‘‘राज्यात अनेक भागात पावसाचा खंड पडला आहे. काही भागात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा २५ टक्के अग्रिम देण्याचा प्रयत्न आहे. विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी अग्रिम देण्याचा प्रयत्न असेल,’’ असे आश्‍वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

नगर येथे शनिवारी (ता.७) रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमासाठी श्री. मुंडे आले होते. त्यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले, ‘‘राज्यात अनेक भागात मागील काळात पावसाने सतत खंड दिला आहे.

त्यामुळे नियमानुसार पीकविमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रिम दिला पाहिजे. त्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागून दिवाळीआधी अग्रिम देण्याचा प्रयत्न आहे.’’

‘‘राज्यात कांद्याचा प्रश्न चर्चेत आहे. कांद्याला सरकारने २ हजार ७१० रुपये बाजार भाव दिला. मात्र त्याबाबत प्रसारमाध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. वेगळे काही समोर आले की त्याबाबत चर्चा करायचे असे सुरु आहे.

हे अजिबात बरोबर नाही. कांद्याला २ हजार २०० रुपये दर देण्याला निर्णय घेतला. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली,’’ असेही मुंडे म्हणाले.

‘‘राष्ट्रवादी’ अजितदादांचीच असेल’

‘‘राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्याचा विषय निवडणूक आयोगाकडे आहे. ज्यांच्या गटाकडे लोकशाहीनुसार जास्त संख्याबळ आहे, त्यानुसारच आयोग निर्णय घेईल. अजितदादांच्या गटाकडे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी आहेत. त्यामुळे पक्ष अजितदादांचाच असेल,’’ असा विश्‍वास कृषिमंत्री मुंडे यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT