Delhi CM Atishi Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi CM Atishi Marlena Oath : आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; ठरल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी शनिवारी (ता.२१) शपथ घेतली. आतिशी यांच्यासह ५ मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. यात गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन आणि मुकेश कुमार अहलावत यांचा समावेश होता. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांच्यासह पाचही मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे मंत्री आणि नेते उपस्थित होते.

आतिशी यांच्यासह ५ मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी नवी दिल्ली येथील राजभवनात दुपारी ४.३० वाजता झाला. शपथविधीनंतर आतिशी या स्वत: पहिल्या तर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे आपच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि देशातील जनतेचं लक्ष लागले होते. दरम्यान केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाची घोषणा केली होती.

केजरीवाल यांची भेट

आतिशी आणि इतर आपच्या नेत्यांनी शपथविधीच्या आधी मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आतिशी यांच्या शपथविधीपूर्वी मंत्री गोपाल राय यांनी, सध्या पक्ष एका विशेष परिस्थितीत नवीन मुख्यमंत्री निवडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयासोबतच जनतेच्या कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल यांनी जनतेला सांगितले की, जर मी प्रामाणिक असेन तर पुढच्या निवडणुकीत तुम्ही मला मत द्या. तसे वाटत नसेल तर मतदान करू नका.

आतिशी दिल्लीच्या १७ व्या मुख्यमंत्री

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या आतिशी दिल्लीच्या १७ व्या तर महिला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या असतील. याआधी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते.

एका नव्या चेहऱ्याला संधी

आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इतर चार जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात केजरीवाल सरकारमध्ये आतिशी यांच्यासह गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन मंत्रिपदावर होते. आता एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली असून ते मुकेश अहलावत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT