Delhi's new CM : दिल्लीचं ठरलं, मुख्यमंत्रीपदी आतिशी, विधीमंडळाच्या बैठकीत केजरीवाल यांनी केला नावावर शिक्कामोर्तब

Atishi Delhi's new CM : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ते आपला राजीनामा मंगळवारी (ता.१७) दुपारी उपराज्यपालांकडे सोपवण्याची शक्यता आहे.
Atishi Delhi's new CM
Atishi Delhi's new CMAgrowon
Published on
Updated on

Pune News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत राजकीय भूकंप केला. त्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली होती. यावेळी सुनीता केजरीवाल आणि आतिशी मार्लेना यांची नावे चर्चेत होती. तर केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावावर मंगळवारी (ता.१७) शिक्कामोर्तब केला. अतिशी यांची निवड विधीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे आतिशी यांनी जर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होतील. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.

Atishi Delhi's new CM
Arvind Kejriwal : राजकीय भूकंप! अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आतिशी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. तर केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्याच दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. तर आज केजरीवाल आपला राजीनामा देणार असून लवकरच आतिशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे बोलले जात आहे.

Atishi Delhi's new CM
Arvind Kejriwal : दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांना अटक

यादरम्यान आप नेते सौरभ भारद्वाज यांनी, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनण्यात पक्षाला रस नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरच अतिशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर आता नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसेल.

आतिशी यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी दिल्ली येथे झाला असून त्यांचे वडील नामविजय सिंह दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आतिशीने यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल, नवी दिल्ली येथून झाले आहे. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. याच विद्यापीठातून त्यांनी शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर अशी पदवी घेतली. त्यानंतर त्यांचा आपच्या नेत्यांशी संपर्क आला आणि त्या आपमध्ये सामिल झाल्या. यानंतर २०२० मध्ये आतिशी यांनी पहिल्यांदा कालकाजी मतदारसंघात विधानसभा लढवली. ज्यात त्यांनी भाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com