Aster Flowers Agrowon
ॲग्रो विशेष

Aster Flower Farming: खेड तालुक्यात ॲस्टरची फुलशेती कोमेजली!

Flower Market: कधीकाळी खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फुलणारी ॲस्टर फुलशेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये दररोज शेकडो ट्रकने जाणारी ही फुले आता केवळ आठवणीत राहिली आहेत.

Team Agrowon

Chakan News: मुंबईतील दादर मार्केटमध्ये खेड तालुक्यातून एकावेळी पन्नास ते शंभर ट्रक ॲस्टरच्या फुलांच्या पाट्याने भरून जायच्या. गेल्या पंचवीस, तीस वर्षांपूर्वीचे हे दृश्य होते. पण आज हे दृश्य नाहीसे झाले आहे. खेड तालुक्यात ॲस्टर अखेर कोमेजले आहे. ॲस्टरच्या फुलांना मोठी मागणी असायची. पण ॲस्टरची शेती नाहीशी झाली आहे. काळुस, वाकी, भाम, भोसे या खेड तालुक्यातील अष्टरच्या नंदनवनात ॲस्टरची फुलशेती हद्दपार झाली आहे हे भयानक चित्र आहे.

खेड तालुक्यातील चाकण परिसर काळुस, वाकी, भाम, रासे, भोसे, शेलगाव, शेलपिंपळगाव, बहुळ, कोयाळी दौंडकरवाडी, वडगाव घेणंद, सोळू, धानोरे, मरकळ व इतर परिसरात गेल्या पंचवीस, तीस वर्षांपूर्वी ॲस्टर फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जायचे. काळुस, वाकी, भाम चाकण येथे मुंबई दादर पुणे येथे फुलांच्या पाट्या (डाग) पाठवणारे अनेक हुंडेकरी असायचे.

हुंडेकरी ॲस्टरच्या फुलांच्या पाट्या (डाग) याचे संकलन करायचे. रात्री आठ ते दहा, अकरा च्या सुमारास या गाड्या मुंबई दादर येथे निघायच्या. सुमारे पन्नास ते शंभर ट्रक चाकण परिसरातून ॲस्टरच्या फुलांच्या जायच्या. पहाटे किंवा सकाळी त्या मुंबईत पोहोचायच्या आणि त्यानंतर मुंबई, दादर मार्केटमध्ये ॲस्टरच्या फुलांची विक्री व्हायची. काही शेतकरी अगदी पाच, दहा ते वीस एकरांपर्यंत ॲस्टरच्या फुलांची शेती करायचे.

शेकडा जुड्यांना त्यावेळेस अगदी दहा, पन्नास रुपयांपासून शंभर, सव्वाशे, दीडशे रुपयांपर्यंत भाव मिळायचा. अधिक भाव मिळाला की काही शेतकरी अगदी लखपती ही व्हायचे. कमी भाव मिळाला की शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व्हायचे. रस्त्यावर फुले टाकून द्यायची शेतात फुले टाकून द्यायची. फुलशेती सोडून द्यायची असे भयानकही चित्र असायचे.

शंभर जुड्यांना दीडशे ते दोनशे रुपये भाव

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, लग्न हंगाम या दिवसात ॲस्टरच्या फुलांना मोठी मागणी असायची. त्यावेळेस अगदी शंभर जुड्यांना शंभर, सव्वाशे, दिडशे रुपये भाव मिळाला तरी शेतकरी खूश व्हायचे. सध्या शंभर जुड्यांना दीडशे ते दोनशे रुपये भाव आहे. परंतु हा भाव कमी आहे. मजुरीच्या व इतर खर्चाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हा भाव परवडत नाही, असे शेतकरी संपत पवळे, रामदास पवळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT