Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market Rate : भाव नसल्याने शेतकऱ्याने फरदडीचा कापूस जनावरांना टाकला

Cotton Bazar Bhav : यंदा कापसाला चांगला दर अत्यंत कमी दिवस मिळाला. दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी अद्यापही कापूस विकलेला नाही.

Team Agrowon

Cotton Akola News : यंदा कापसाला चांगला दर अत्यंत कमी दिवस मिळाला. दर वाढतील या अपेक्षेने अनेकांनी अद्यापही कापूस विकलेला नाही. मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यातील कोथळी येथील शेतकऱ्याला फरदडचा कापूस अवघा ४००० रुपये क्विंटल व्यापाऱ्याने मागितला.

त्यामुळे कापूस विकण्याऐवजी या शेतकऱ्याने थेट जनावरांना खाऊ घालण्याचा पवित्रा घेतला. यावरून शेतकऱ्यांचा संताप स्पष्ट होत आहे.

गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने कापूस लागवड वाढली. यंदा मात्र सुरुवातीपासूनच कापसाचा दर दबावात राहत आलेला आहे. वाढलेला व्यवस्थापनाचा खर्च पाहता कापसाला किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळेल या अपेक्षत शेतकरी होते.

संपूर्ण हंगाम लोटला तरी हा दर मिळू शकला नाही. ८००० ते ९००० दरम्यान कापूस विकला गेला. दर वाढेल या आशेने शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून आहे.

चांगल्या कापसालाच दर नसल्याने फरदडीचा कापूस आणखी कमी दरात व्यापारी मागत आहेत. कोथळी येथील संतोष जोहरी यांना फरदडीच्या क्षेत्रातून सहा ते सात क्विंटल कापूस आला. मजुरांना २५० ते ३०० रुपये मजुरी दिली.

एका मजुराने ८ ते १० किलो कापूस वेचून दिला. हा कापूस विक्रीसाठी व्यापाऱ्याला बोलावले तर त्याने अवघा चार हजार रुपये क्विंटल कापूस मागितला. त्यामुळे जोहरी यांनी हा सौदा अमान्य करीत फरदडीचा कापूस आपल्या बैलजोडी, म्हशींना खायला टाकला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT