Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Crop Damage : बाजारभाव नसल्याने तीन एकरांतील पपईवर फिरवला ट्रॅक्टर

Papaya Rate Issue : पपईलाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने धनज येथील शेतकऱ्याने तीन एकरांतील पपईवर ट्रॅक्टर चालवला.

Team Agrowon

Washim News : एकीकडे खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना दुसरीकडे पपईलाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने धनज येथील शेतकऱ्याने तीन एकरांतील पपईवर ट्रॅक्टर चालवला.

कारंजा तालुक्यातील धनज येथील शेतकरी निनाद गजानन टेकाडे यांनी तीन एकरांवर पपईची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च केला.

परंतु पपई विक्रीस आल्यानंतर केवळ ४ ते ५ रुपये किलोचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. परिणामी या शेतकऱ्याने बुधवारी (ता.१०) आपल्या तीन एकर क्षेत्रातील पपई पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी टेकाडे हे दर वर्षी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पिके घेतात. त्यानुसार त्यांनी यंदा तीन एकरांत पपईची लागवड केली. रोपे व मशागत असा अडीच लाख रुपयांचा खर्च केला. परंतु ऐनवेळी पपईचे भाव पडल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले.

शेतातील उत्पन्नातून चार पैसे अधिक पदरी पडावे म्हणून शेतकरी फळबाग लागवडीकडे वळत आहेत. कारंजा तालुक्यात फळबाग लागवडीचा आकडा वाढला. फळपिकांनाही भाव मिळत नसल्याने फळबागधारक शेतकरी देखील चिंताक्रांत झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT