Sugarcane Production Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation Limit : नव्याने ऊस लावू नका, पाणी मिळणार नाही

Water Scarcity : पाण्याची परिस्थिती बिकट असल्याने पाणी पुरवठादारांकडून नव्याने उसाची लागण करू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे.

Team Agrowon

Kolhapur News : यंदा पाऊस कमी झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन नव्याने ऊस लागण न करण्याचे आवाहन शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केले जात आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रालाच पाणी कसे पुरवता येईल याचे नियोजन त्यांच्याकडून आतापासूनच सुरू आहे.

यंदाचे वर्ष कमी पावसाचे ठरले आहे. आधी वळीव बरसला नाही. त्यानंतर मॉन्सूनही वेळेवर आला नाही. हमखास लागणारी बहुतांश नक्षत्रही कोरडी गेली. परिणामी, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानेही गडहिंग्लज तालुका मध्यम दुष्काळी जाहीर केला आहे.

तब्बल ५० वर्षांनंतर अशी परिस्थिती ओढवली आहे. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनासह शेतकऱ्यांच्या पातळीवरही आतापासूनच त्यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे दिसून येत आहे.

गडहिंग्लज तालुक्यात ऊस पीक सर्वाधिक घेतले जाते. शेतकऱ्यांकडून दरवर्षी नव्याने उसाची लागण केली जाते. एकूण क्षेत्राच्या साधारण ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर नवी लागण होते. पण, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. पाण्याची उपलब्धता कमी होणार असल्याने नव्या लागणीवर मर्यादा आल्या आहेत.

सर्वच शेतकऱ्यांचे स्वत:चे पाणी नाही. मोठे शेतकरीही हिरण्यकेशी नदी व लघुपाटबंधारे प्रकल्पांवरून केलेल्या पाणी योजनांवर अवलंबून आहेत. त्यांच्याकडून चौथाईने पाणी घेतले जाते. पाण्याची परिस्थिती बिकट असल्याने पाणी पुरवठादारांकडून नव्याने उसाची लागण करू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे.

जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाला पाण्याचा फेर बसेल. त्यानंतर उसाला पाण्याची खरी गरज असते. नव्या लागणीमुळे उसाचे क्षेत्र वाढते. असे झाले तर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना वेळेत पाणी देणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे नव्याने ऊस लागण करू नका, असे आवाहन पाणीपुरवठादारांनी केले आहे.

जमिनीला होणार फायदा

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नव्याने ऊस लागण न करण्याचे आवाहन पाणीपुरवठादारांकडून केले जात आहे. उसाची नव्याने लागण नसल्याने जमीन तापेल. तसेच उसाऐवजी नवे पीक घेतले जाईल. त्यामुळे जमिनीत पीकपालट होईल. एकाच पिकामुळे घसरलेला जमिनीचा पोत सुधारण्यास फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT