Onion Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : लिलाव न पुकारल्याने कांदे रस्त्याच्या कडेला ओतले

लिलाव सुरू असताना ट्रॅक्टरजवळ येऊनही व्यापारी लिलाव न करताच निघून गेल्याने चांदवडमधील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तीस क्विंटल कांदा रस्त्याच्या कडेला ओतून दिला.

Team Agrowon

लासलगाव, ता. निफाड : लिलाव सुरू असताना ट्रॅक्टरजवळ येऊनही व्यापारी लिलाव न करताच निघून गेल्याने चांदवडमधील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तीस क्विंटल कांदा (Onion) रस्त्याच्या कडेला ओतून दिला.

कोलटेक पाटे (ता. चांदवड) येथील सचिन विठ्ठलराव गांगुर्डे आणि रवी किसन तळेकर यांनी लेट खरीप लाल कांदा पीक घेतले होते. अंतिम टप्प्यातील दुय्यम प्रतवारी असलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून त्यांनी दहा ते बारा किलोमीटरवर लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता.

बुधवारी (ता. १२) दुपारच्या सत्रात लिलावाला सुरुवात झाल्यानंतर ट्रॅक्टरजवळ येऊन या कांद्याला ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापारी पुढे निघून गेले.

तीन हजार रुपये खर्च करून कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे काहीतरी बाजारभावाने लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र, लिलाव न झाल्याने त्यांनी सायंकाळी घरी परत जाताना बाजार समिती आवाराबाहेर काही अंतरावरील बायपासला रस्त्याच्या कडेला कांदा ओतून दिल्याचे तळेकर यांनी सांगितले.

दरम्यान, बाजार समितीतील सूत्रांशी संपर्क सधला असता, संबंधीत शेतकऱ्याने दुपारच्या सत्रात खाद चोपडा, बिन सालीचा कांदा लिलावासाठी नवीन कांदा मार्केटमध्ये आणला. परंतु, या ठिकाणी फक्त चांगल्या प्रतीचा कांद्याचा लिलाव होतो.

समितीच्या कर्मचाऱ्यांनी हा माल गुरुवारी (ता. १३) सकाळच्या सत्रात जुन्या मार्केटमध्ये नेल्यास तेथे लिलाव होऊ शकतो, असे सांगितल्यावर त्यांनी याला मान्यता दिली. परंतु, नंतर त्यांनी कांदा ओतून दिल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेत कुटुंबातील सर्वांना संरक्षण, आर्थिक सहाय्य किती? शासन निर्णय जारी

Crop Insurance 2026 : मुख्यमंत्री फडणवीसांकडे कृषिमंत्री भरणे यांनी काय मागणी केली?

Naigaon Drought : नायगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Maharashtra Rain : जून ते ऑगस्ट पावसाच्या खंडाचे १४ ते ५८ दिवस

Kharif Crop Issues: खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT