AI In Dairy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

AI For Milk Production : दूध उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार

Dairy Farming : दूध धंदा हा कष्टाचा असला तरी त्यामधील कष्ट कमी करण्यासाठी अभ्यासपूर्ण लहान लहान बाबींचा विचार करून हा व्यवसाय करावा. दूध व्यवसायात पाच तत्त्वांचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Team Agrowon

Latur News : नॅचरल डेअरी मार्फत दूध उत्पादन वाढीसाठी A.I (कृत्रिम बुद्धिमता) तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरल उद्योग समूहातील नॅचरल डेअरीचा १४ वा वर्धापन दिन व दुग्धजन्य पदार्थ विस्तारित प्रकल्पाचा प्रारंभ आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक- पशू पोषण डॉ. शैलेश मदने यांचे हस्ते व नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न श्री. ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १८) संपन्न झाला.

या वेळी श्री ठोंबरे बोलत होते. श्री ठोंबरे म्हणाले, की नॅचरल डेअरीचे माध्यमातून सर्व सामान्य जनतेला आर्थिक स्थैर्य देण्याचे मोठे काम केले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी वापरण्यात येणारी एआय टेक्नॉलॉजी (कृत्रिम बुद्धिमत्ता) यापुढे नॅचरल डेअरीमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी वापरण्यात येणार आहे. दूध संकलक व दूध उत्पादक यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर एसएस कॅन देण्यात येणार असल्याचे श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

डॉ. शैलेश मदने म्हणाले, की दूध धंदा हा कष्टाचा असला तरी त्यामधील कष्ट कमी करण्यासाठी अभ्यासपूर्ण लहान लहान बाबींचा विचार करून हा व्यवसाय करावा. दूध व्यवसायात पाच तत्त्वांचा वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामध्ये जनावरांना पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे.

जनावरांसाठी मुरघास वापर केला पाहिजे. गोठ्यातील तापमान संतुलित असले पाहिजे, त्यासाठी शेडवरील पत्र्यांना वरून पांढरा रंग लावून गोठ्यातील तापमान कमी केले पाहिजे. जनावरांना दर तीन महिन्यानी जंताचे औषध दिले पाहिजे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दूध काढण्यासाठी मशिनचा वापर करणे या बाबी आवश्यक असल्याचे डॉ. मदने यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिभूषण श्री. पांडुरंग आवाड यांनी केले. तर तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT