Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Shekhar Gaikwad : शेतजमीन मुलीच्या नावावर खरेदी केली; पुढे काय झाले?

एका गावात दुर्गासिंग नावाच्या व्यापाऱ्याची शेतजमीन होती. दुर्गासिंग व्यापारी असल्यामुळे त्याला व्यापारात मिळणाऱ्या नफ्यातून त्याने थोडी थोडी शेतजमीन खरेदी केली होती.

शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad : एका गावात दुर्गासिंग नावाच्या व्यापाऱ्याची शेतजमीन (Agriculture Land) होती. दुर्गासिंग व्यापारी असल्यामुळे त्याला व्यापारात मिळणाऱ्या नफ्यातून त्याने थोडी थोडी शेतजमीन खरेदी केली होती. गावातल्या कुणीतरी एका शेतकऱ्याने दुर्गासिंगला सांगितले, की सिलिंगपेक्षा जास्त जमीन खरेदी (Land Purchase) करता येत नाही.

दुर्गासिंगने त्याच्या सुनिता नावाच्या ११ वर्षांच्या मुलीच्या नावावर जमीन खरेदी केली. येणाऱ्या पुढील दोन-तीन वर्षांत सुनिताच्या नावावर १५ एकर जमीन झाली. जमीन जरी सुनिताच्या नावावर होती तरी ती दुर्गासिंगच्याच ताब्यात होती आणि त्यात पिके घेऊन उत्पन्न सुद्धा दुर्गासिंगच मिळवत होता.

काही वर्षांनंतर सुनिताचे लग्न झाले. सुनिताच्या लग्नानंतर दुर्गासिंगचा व्यापार मात्र हळूहळू कमी होऊ लागला आणि त्याला व्यवसायात सारखा तोटा होऊ लागला. दुर्गासिंगला व्यवसायासाठी बँकेचे कर्ज काढण्याची गरज भासू लागली.

दुर्गासिंगने कर्ज काढण्यासाठी म्हणून बँकेच्या कागदपत्रांवर मुलीच्या सह्या लागणार, म्हणून दुर्गासिंग त्याच्या मुलीच्या म्हणजे सुनिताच्या घरी गेला व सुनिताला सांगितले, की आपल्या शेतजमिनीवर बँकेचे कर्ज काढण्यासाठी मला या कागदपत्रांवर तुझ्या सह्या लागणार आहेत.

पण आता परिस्थिती बदलली होती. सुनिताच्या नवऱ्याने धमकी दिली, की जर सुनिताने बँकेच्या कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या तर मी हे लग्न मोडेन.

त्यामुळे दुर्गासिंगचा नाईलाज झाला. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी त्याला पुढे काहीच करता येत नव्हते. आता परिस्थिती बदलली होती, हे खरं!

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे कित्येक वेळा त्या त्या वेळी माणसं सर्वोत्तम पर्याय निवडून प्रॉपर्टीविषयी निर्णय घेतात. परंतु परिस्थिती पुढे बदलली, की नवे प्रश्‍न निर्माण होतात, काळाचा महिमा! दुसरे काय?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT