Maize Crop Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Army Worm : इंदापुरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

Agricultural Issues : इंदापूर तालुक्यात चालू रब्बी हंगामात सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Pune News : इंदापूर तालुक्यात चालू रब्बी हंगामात सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या आळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या दीड ते दोन दशकापूर्वी मका पीक हे निरोगी पीक म्हणून ओळखले जात होते, मात्र गेल्या काही दशकांपासून मका पिकाची पाने लष्करी अळी कुरतडून पिकाचे मोठे नुकसान करीत आहे. जर या किडीचे नियंत्रण वेळेवर केले नाही तर मात्र उत्पन्नात मोठी घट येत येऊन शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान होत आहे.

त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी सतत कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मक्याचे पीक हे वर्षातील तीनही हंगामात घेतले जाते, या पिकापासून चांगले उत्पादन व चांगला बाजारभावही मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे, मात्र या पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे.

चार वेळा फवारणी

अधिक उत्पन्नासाठी मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. सध्या चालू रब्बी हंगामातील मका पीक वाढीच्या अवस्थेत असून लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी किमान सुमारे चार वेळा कीटकनाशक फवारणी मका पिकावर करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT