Agriculture Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Seeds : अकोल्यात वाढतेय काळे जिरे, सोप, ओवा, चिया सीडचे क्षेत्र

Seed Cultivation : यंदा जिल्ह्यात काळे जिरे, सोप, ओवा तसेच चिया सीडची लागवड विस्तारत आहे. जिल्ह्यात प्रथमच चिया सीड २०० एकरांपर्यंत लागवड क्षेत्र पोहोचण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच चिया सीडचे एवढ्या क्षेत्रावर जिल्ह्यात लागवड होत आहे.

Team Agrowon

Akola News : रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा या दोन पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून इतर पिकांकडे वळत आहेत. यंदा जिल्ह्यात काळे जिरे, सोप, ओवा तसेच चिया सीडची लागवड विस्तारत आहे. जिल्ह्यात प्रथमच चिया सीड २०० एकरांपर्यंत लागवड क्षेत्र पोहोचण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच चिया सीडचे एवढ्या क्षेत्रावर जिल्ह्यात लागवड होत आहे.

अकोला जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून खारपाण पट्ट्यात ओव्याची रब्बीत लागवड केली जाते. कमी पाण्यात येणारे हे पीक उत्पादनात बऱ्याच शेतकऱ्यांचा हातखंडा निर्माण झालेला आहे. या पिकाच्या जोडीला आता काळे जिरे, सोप, चिया सीडची लागवड सुद्धा होऊ लागली आहे.

चिया सीडला बाजारात चांगली मागणी असून दरही मिळतो आहे. काही कंपन्या चिया सीड उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील झालेल्या असून करार पद्धतीने शेतकऱ्यांसोबत काम सुरू केले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने गव्हासारखे जास्त पाण्याचे पीक कमी लागवड होत आहे. तर हरभऱ्यालाही गेल्या काही हंगामात मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने आणि कमी दरांमुळे शेतकरी पर्यायी पिकांच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. यामुळेच यंदा चिया सीडची लागवड वाढत आहे.

चिया सीडच्या लागवडीबाबत कृषी विभाग व आत्मा यंत्रणेमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. चिया सीडचे व्यवस्थापन कसे करावे, पीक उत्पादनासाठी आवश्‍यक असलेले बारकावे समजून सांगण्यात येत आहेत.

या वर्षी ‘आत्मा’मार्फत काळे जिरे, सोप, ओव्याचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे. येत्या काळात काही शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी अजमेरलाही पाठवण्याचे नियोजन आहे. तेथील बाजारपेठ, लागवड तंत्राच्या अनुषंगाने अभ्यास केला जाईल. शेतकऱ्यांना उत्पादनासोबतच मार्केटींग, प्रक्रियेचीही जोड देण्याचा प्रयत्न आहे.
डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक, आत्मा, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra MLC Election 2026: विधानपरिषदेच्या ३ पदवीधर, २ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणुकीची घोषणा

Serum Biochemistry: पशुरोग निदानामध्ये सीरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचे महत्त्व

Water Sharing GR: सात वर्षांपूर्वीच्या शासन निर्णयाचा ‘जीआर बाळा’ म्हणून वाढदिवस साजरा!

Flower Market: श्रावणापासूनची फुलांची मागणी गणपती काळातही कायम

Dairy Business: निष्ठा, लळा, उत्कृष्ट नियोजनातून फायदेशीर दुग्धव्यवसाय

SCROLL FOR NEXT