MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी

Team Agrowon

Ahilyanagar News : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी दिली आहे. यंदासाठी (२०२४-२५) मूग, उडीद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सोयाबीन, उडीद, मुगाची हमीदराने खरेदी करावी यासाठी शासनाकडून यंदाही हमी केंद्रे सुरू केली जात आहेत. यावर्षी मुगाची ८ हजार ६८२ प्रति क्विंटल, उडिदासाठी ७ हजार ४०० प्रति क्विंटल तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.

मूग व उडीद पिकाची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी, २०२५, तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते १२ जानेवारी, २०२५ या कालावधीत केंद्रावरून खरेदी करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या १८ केंद्रांपैकी खालील १२ केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

त्यात शेवगाव तालुक्यामध्ये बोधेगाव व हातगाव, पाथर्डी तालुक्यात बाजार समिती पाथर्डी, जामखेड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, कर्जत तालुक्यात बर्गेवाडी रोड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात घारगाव, घुटेवाडी, मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, पारनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर, राहाता तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, कोपरगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे खरेदी करण्यात येईल.

सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्डची राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले पासबुकची छायांकित प्रत, चालू वर्षाचा ८-अ व ७/१२ उतारा आणि मूग, उडीद व सोयाबीन पिकाची नोंद असलेला ऑनलाइन पीकपेरा व चालू मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाचा म्हणजेच काहीही कचरा नसलेला चाळणी करुन सुकवून माल केंद्रावर आणावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT