Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : बाळापूर, पातूर तालुक्‍यांत पाणीटंचाई उपाययोजनांना मंजुरी

Water Crisis : सध्या पाणीटंचाई वाढत चालली असून, प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

Team Agrowon

Akola News : सध्या पाणीटंचाई वाढत चालली असून, प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बाळापूर व पातूर तालुक्यातील १९ गावांत २० उपाययोजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. विंधन विहीर व कूपनलिका आदी उपाययोजनांचा समावेश आहे. दोन कोटी ८५ लाख ९४ हजार ४८६ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील रहिवासी नागरिकांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

त्या अंतर्गत या वर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून २०२४ या कालावधीसाठी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.

या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. आराखड्यात मंजुरी प्राप्त उपाययोजनांपैकी २० उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बाळापूर तालुक्यातील हिंगणा, निंबी, सोनाळा, बहापुरा, वझेगाव, नांदखेड, रिधोरा, पातूर तालुक्यात बोडखा, शिर्ला, विवरा, जांभरूण, भंडारज बुद्रुक, आलेगाव, माळराजुरा, गोंधळवाडी, जांब, पाचरण, वनदेव, आसोला या गावांत उपाययोजना राबबिण्यात येणार आहेत. पाणीटंचाईची कामे ३१ मे २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून त्याद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. असे आदेश देण्‍यात आले.

१५९ उपाययोजना पूर्ण

यंदाच्या पाणीटंचाई निवारण आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यात २३८ गावांसाठी ५५० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५९ गावांसाठीच्या १६० उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. तर १५९ उपाययोजना पूर्ण झाल्या असून, त्यापासून १४८ गावांतील ग्रामस्थांना दिलासाही मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT