Silk Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : केंद्राच्या ‘सिल्क समग्र-२’ योजनेला राज्यात मान्यता

Silk Samgra Scheme : राज्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाकडून शुक्रवारी (ता. ९) अखेर मान्यता देण्यात आली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाकडून शुक्रवारी (ता. ९) अखेर मान्यता देण्यात आली. ‘सिल्क समग्र-२’ अंतर्गत केंद्र शासनाने २२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यामध्ये अतिरिक्‍त २५ टक्‍के निधी राज्य शासनाला टाकावा लागेल. या योजनेतून राज्यात तुती लागवड ते ऍटोमॅटिक रेलिंग मशिन (एआरएम) सारख्या कामांना चालना मिळेल. रेशीम शेतीतून राज्यात शेती अर्थकारणाला बळकटी मिळाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रेशीम विकास संचलनालयाद्वारे ‘महारेशीम अभियाना’च्या‌ जोडीला केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र योजना’ही राबविली जात आहे.

यातून तुती लागवड ते कापड निर्मितीपर्यंतची कोषोत्तर प्रक्रिया केली जाते. ‘सिल्क समग्र-१’चा पहिला टप्पा २०१८-१९ ते २०१९-२० असा होता. त्यानंतर त्याचा कालावधी वाढवत २०२०-२१ या वर्षात योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता थेट ‘सिल्क समग्र-२’ या योजनेची अंमलबजावणी राज्यात २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत केली जाणार आहे.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांच्यासह उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी मंजूर झाल्याने आता राज्यात रेशीम क्षेत्रात आणखी वाढ होईल, अशी शक्‍यता आहे.

विशेष म्हणजे येत्या काळात कोष प्रक्रियेसाठी ऍटोमॅटिक रेलिंग मशिनचाही पुरवठा या योजनेतून करणे शक्‍य होईल. ‘पोकरा’ किंवा ‘मनरेगा’तून यापूर्वी लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही, असेही शासन आदेशात म्हटले आहे.

तुती लागवड ते ऍटोमॅटिक रेलिंग मशिनचा अशा सर्वच बाबींसाठी यात अनुदान मिळेल. पाच एकरापर्यंतची मर्यादा या योजनेच्या लाभासाठी आहे. यापूर्वी अनेकांच्या आर्थिक सक्षमतेचे कारण रेशीम शेती ठरली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- गोरक्ष गाडीलकर, संचालक, रेशीम संचालनालय, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT