Vithhal Rukmini Mandir  Agrowon
ॲग्रो विशेष

Vithhal Rukmini Mandir : टीसीएस कंपनीकडून टोकन दर्शन प्रणालीच्या प्रस्तावास मंजुरी

Pandharpur Token Darshan : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Team Agrowon

Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ व वेळेत व्हावे, यासाठी तिरुपती आणि शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकन दर्शन पद्धती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टीसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता.

त्यावर सदर कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजुर केला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

त्यानंतर पत्रकारांना औसेकर महाराज यांनी ही माहिती दिली. बैठकीस मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जीर्णोद्वार कामाचा आढावा घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत अशा सूचना पुरातत्त्व विभाग व संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या.

तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणे, श्री क्षेत्र आळंदी येथे मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणे, सन २०२५ मधील श्रींच्या पूजा ऑनलाइन बुकिंग करणे, मंदिरातील निर्माल्यापासून धूप - अगरबत्ती तयार करणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.

शिर्डी, शेगावचा होणार अभ्यासदौरा

कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध संगणक प्रणाल्या टीसीएस कंपनीकडून मोफत उपलब्ध करून घेणे व शिर्डी व शेगाव देवस्थाने ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत.

या देवस्थानमधील कार्यालयीन कामकाज, कामकाजासाठी केलेल्या अत्याधुनिक साधनांचा वापर, भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेण्यासाठी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी, पदाधिकारी व वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे या वेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT