Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Kasturi Cotton : कस्तुरी कापूस भारत गाठी म्हणून १५ हजार गाठींना मंजुरी

Cotton Production : सेलू येथे जिनिंग, प्रेसिंग उद्योजक, एफपीओंच्या विशेष बैठकीतील माहिती

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Cotton News : परभणी ः भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व इतर कापूस खरेदीअंतर्गत विविध राज्यांत सोमवारपर्यंत (ता. १) तयार केलेल्या कापूस गाठींपैकी १५ हजार गाठींना ‘कस्तुरी कापूस भारत’ गाठी म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी कस्तुरी कापूस भारत ब्रँडविषयी कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग, प्रेसिंग उद्योजकांमध्ये जाणीव जागृतीवर आगामी काळात भर दिला जाणार आहे.

भारतीय कापसाचा अधिकृत ब्रँड ‘कस्तुरी कापूस भारत’ प्रकल्पाअंतर्गत भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), द कॉटन टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल -टेक्सप्रोसिल यांच्यातर्फे जाणीव जागृती व्हावी यासाठी सेलू (जि. परभणी) येथील केशवराज कॉटन क्लस्टरमध्ये जिनिंग-प्रेसिंग उद्योजक आणि कापूस शेतकरी उत्पादक कंपन्या यांची विशेष बैठक मंगळवारी (ता. २) पार पडली, त्या वेळी ही माहिती देण्यात आली.

या वेळी टेक्सप्रोसिलच्या कस्तुरी कापूस भारत प्रकल्पाचे सहसंचालक उदयसिंह खरात, आयसीएआरअंतर्गत सिरकॉटचे निवृत्त प्राचार्य डॉ. प्रदीप मनध्यान, कमोडीटी मार्केटचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर, भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) छत्रपती संभाजीनगर विभागीय महाव्यवस्थापक पी. अमरनाथ रेड्डी, केशवराज कॉटन क्लस्टरचे अध्यक्ष रामेश्वर राठी, उपाध्यक्ष नीलेश बिनायके, संचालक ब्रिजगोपाल काबरा, गौरव बियाणी, देवेंद्र छल्लाणी, दिनेश मानधने, संतोष सोमाणी, रमण तोष्णीवाल आदींसह शेतकरी प्रकाश हरकळ, पंडित थोरात आदी उपस्थित होते.

खरात म्हणाले, की सीसीआय व इतर मिळून ब्लॉक चेनवर एकूण ६३ हजार ७०० गाठी तयार करण्यात आल्या असून १५ हजार गाठींना ‘कस्तुरी कापूस भारत’ गाठी म्हणून मान्यता देण्यात आली. १९ हजार ६०० गाठी कस्तुरी कापसाच्या निकषात बसल्या नाहीत. आणखी २९ हजार १०० गाठी प्रक्रियेत आहेत.

पी. अमरनाथ रेड्डी म्हणाले, की सीसीआयकडून खुल्या बाजारात कापूस खरेदी करताना कस्तुरी कापूस भारत ब्रँडसाठी खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांनी स्वच्छ कापूस वेचणी करण्यासह उच्च दर्जाचा कापूस वेगळा साठविणे आवश्यक आहे. कस्तुरी कापूस भारत ब्रॅँडबाबत शेतकरी तसेच जिनिंग उद्योजकांमध्ये जागृती करावी लागेल.

कुवळेकर म्हणाले, की शेतकरी, व्यापारी, प्रक्रियाधारक यांना उत्पादन कच्चा माल किंमत जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी कमोडीटी बाजार उपयुक्त आहे. कमोडीटीजची दररोज ३ ते ४ लाख कोटींची उलाढाल होत असते. एवढ्या मोठ्या बाजाराकडे केवळ ग्राहक म्हणून पाहणे अयोग्य आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार, नोकरी, व्यापार करण्याच्या प्रचंड संधी यात आहेत. राठी म्हणाले, की जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जुलै २०२३ मध्ये सेलू केशवराज कॉटन क्लस्टरअंतर्गत कॉटन टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT