Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : ‘नियोजन’ मोतेंकडे; तर ‘आत्मा’ भोसलेंकडे

Agriculture Commissionerate : कृषी आयुक्तालयात रिक्त झालेल्या संचालकपदांवर नव्या अधिकाऱ्यांची निवड न करता अतिरिक्त कार्यभार देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.

मनोज कापडे

Pune News : कृषी आयुक्तालयात रिक्त झालेल्या संचालकपदांवर नव्या अधिकाऱ्यांची निवड न करता अतिरिक्त कार्यभार देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यामुळे प्रक्रिया व नियोजन विभागाचा कार्यभार रवींद्र भोसले यांच्याकडे; तर ‘आत्मा’ची सूत्रे डॉ. कैलास मोते यांच्याकडे देण्यात आली आहेत.

आयुक्तांखालोखाल संचालकपद सर्वोच्च समजले जाते. यावर्षात सर्व संचालक निवृत्त होत असल्यामुळे सध्याच्या सेवाज्येष्ठ सहसंचालकांना नियुक्त केले जाईल किंवा अतिरिक्त पदभार मिळतील, अशी अटकळ होती.

त्यानुसार अशोक किरन्नळी, सुनील बोरकर, रफिक नाईकवडी आणि विनयकुमार आवटे या चार सहसंचालकांना संचालकपदावर काम करण्याची संधी मिळेल, असेही बोलले जात होते. परंतु, आयुक्तालयात वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत.

विस्तार संचालकपदावरुन दिलीप झेंडे निवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार श्री. आवटे यांच्याकडे येईल, असे सांगितले जात होते. परंतु, प्रत्यक्षात पदभार विकास पाटील यांना मिळाला आहे. ते गुणनियंत्रण संचालक आहेत. ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे तसेच प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक सुभाष नागरे गेल्या शुक्रवारी (ता.३१) निवृत्त झाले.

या पदांवर श्री. नाईकवडी किंवा किरन्नळी यांची वर्णी लागेल, असे चर्चेत होते. मात्र, प्रत्यक्षात ‘आत्मा’चा पदभार मृद्संधारण संचालक रवींद्र भोसले यांना मिळाला आहे. तसेच, प्रक्रिया विभागाची सूत्रे फलोत्पादन संचालक डॉ. मोते यांना देण्यात आली आहेत.

सेवाज्येष्ठ सहसंचालकांना अतिरिक्त पदभार देण्याची संधी हेतुतः नाकारण्यात आल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यमान संचालकांकडे अतिरिक्त कार्यभार देणे योग्यच आहे. सहसंचालकपदावर तीन वर्षांची सेवा केल्याचा अनुभव असेल तरच संचालकपदी नियुक्त करावे, असे नियमात आहे. या नियमाला सध्याचा एकही अधिकारी पात्र ठरत नाही.

दरम्यान, कृषी आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली झाल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. परंतु, कृषी आयुक्तपदाची सूत्रे शासनाने कोणालाही न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी पूर्णवेळ आयुक्त नसताना तात्पुरता पदभार संचालकांना देण्याची उदाहरणे आहेत.

त्यानुसार, आता आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार ज्येष्ठतेनुसार डॉ. मोते यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला, संचालकांच्या बदल्यांमध्ये डॉ. मोते यांना आता फलोत्पादनऐवजी निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग हवा असल्याचे बोलले जाते आहे.

‘गुणनियंत्रण’साठी जोरदार रस्सीखेच

राज्याच्या गुणनियंत्रण संचालकपदी वर्णी लागण्यासाठी डॉ. कैलास मोते, सुनील बोरकर व रफिक नाईकवडी अशी तीन नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र, मंत्रालयाची मर्जी संपादन करणाऱ्यास संचालकपद मिळेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT