Gram Panchayat Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यपदांसाठी तिप्पट अर्ज दाखल

Amaravati Local Body Election : सरपंच आणि सदस्यपदासाठी अक्षरशः नामांकनांचा पाऊस पडला आहे. या दोन्ही पदांसाठी दुप्पट, तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत.

Team Agrowon

Amravati News : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची रणधुमाळी आता रंगात आली असून ७० ग्रामपंचायतींसाठी इच्छुकांमध्ये तीव्र चुरस दिसून येत आहे. सरपंच आणि सदस्यपदासाठी अक्षरशः नामांकनांचा पाऊस पडला आहे. या दोन्ही पदांसाठी दुप्पट, तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत. २२ सरपंचपदांसाठी १२३ तर २३८ सदस्यपदांसाठी ४०८ जणांनी नामांकन दाखल केले आहे.

नामांकन दाखल करण्याचा शुक्रवार (ता. २०) अखेरचा दिवस होता. जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक तसेच २० ग्रामपंचायतींमध्ये मुदत संपल्याने निवडणुका घेण्यात येत आहेत. २२ सरपंचपद आणि २३८ सदस्यपदांसाठी तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

२० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची थेट निवडणूक होणार असून सदस्य पदांसाठी सुद्धा मतदान होणार आहे. तर ५० ठिकाणी पोटनिवडणूक होणार असून दोन जागी सरपंचांची सदस्यांमधून निवड केली जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली.

२३ ला नामांकन अर्जांची छाननी होणार असून २५ पर्यंत नामांकन अर्ज परत घेण्याचा अवधी आहे. त्याचदिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. ५ नोव्हेंबरला सकाळी सातपासून मतदानाला सुरवात होईल. २० पैकी १० ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांना संधी मिळणार आहे.

चिखलदरामधून सर्वाधिक उमेदवार

चिखलदरा तालुक्यातून सरपंचपदासाठी सर्वाधिक ३४ तर सदस्यपदासाठी अचलपूर तालुक्यातून सर्वाधिक ७८ नामांकन दाखल झाले आहेत.

केंद्र शासनाचा सर्वाधिक निधी

केंद्र सरकारचा सर्वाधिक निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात थेट वळता होत असल्याने सरपंचपदाला मागील काही काळापासून महत्त्व प्राप्त झाले आहे. ते पाहता इच्छुकांची गर्दी आता ग्रामपंचायतींकडे वळल्याचे चित्र आहे.

झेडपी, पंचायत समितीकडील गर्दी ग्रामपंचायतींकडे येणाऱ्या काळातसुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी तयारीला ‘ब्रेक’ दिला आहे. मात्र किमान ग्रामपंचायतींमध्ये तरी आपला नंबर लागावा, यासाठी अनेक दिग्गज सरपंचपदाच्या ‘रेस’मध्ये सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT