Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : रब्बी पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Rabi Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजना या रब्बी हंगामात राबवण्यात येत आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (area approach) धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

Team Agrowon

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजना या रब्बी हंगामात राबवण्यात येत आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (area approach) धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड केली असून शेतकऱ्यांनी या रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा व रब्बी कांदा या पिकांचा विमा काढण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना प्रतिअर्ज केवळ एक रुपया भरून पीकविमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे.

या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता दर व शेकऱ्यांना प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम एक रुपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल.

पीकविमा नाव नोंदणी करताना आधार संलग्न बँक खाते क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहे. या क्रमांकला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणीअंतर्गत पिकांची नोंद करावी.

विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीकपाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीकपाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी विमा योजनेच्या www.pmfby.gov.in या पोर्टलवर किंवा सामूहिक सेवा केंद्राचे माध्यमातून शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.

पीकविमा योजनेच्या अधिक माहितीसाठी www.pmfby.gov.in या पोर्टल किंवा संबंधित पीकविमा कंपनीचे कार्यालय, केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन १४४४७, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही श्री. ढगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Humani Bhunga Control: हुमणीच्या भुंगेऱ्यांचे वेळीच नियंत्रण का गरजेचे?

Digital Satbara Download: डिजिटल ७/१२ उतारा कसा डाऊनलोड करायचा?; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Migratory Birds: पाणवठ्यांवर सातासमुद्रापारचे पाहुणे दाखल

Sugarcane Payments Pending: थकीत एफआरपी न दिल्यास आंदोलन करणार : राजू शेट्टी

Water Shortage: गडहिंग्लज, आजरा तालुक्यांत शेतीला मे अखेरपर्यंतच पाणी

SCROLL FOR NEXT