Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी व्हा

Crop Insurance Scheme : अकोला जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी पिकांसाठी राबवली जात आहे.

Team Agrowon

Akola News : या हंगामासाठी खरीप पीकविमा योजना राबवली जात असून आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. आजवर जिल्ह्यातील एक लाख ८६ हजार शेतकरी सहभागी झाले असून खरिपाचे तीन लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र विमा अधिग्रहीत झाले आहे.

अकोला जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी पिकांसाठी राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा १६ जूनपासून सुरू झाली होती. सोमवारी (ता.१५) सहभागाची मुदत संपली होती.

राज्य शासनाने बुधवार (ता.३१) पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास दिला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून आता पीकविमा योजनेत भाग घेता येणार आहे. शेतकऱ्यांना प्रतिअर्ज केवळ एक रुपया भरावा लागेल.

पीकविमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रतिअर्ज ४० रुपये दिले जातात. सामूहिक सेवा केंद्र चालकाकडून पैशांची मागणी केली जात असेल त्याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार देता येईल.

आतापर्यंत १ लाख ८६ हजार सहभागी

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८६ हजार १८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील तीन लाख १५ हजार ६१० हेक्टर खरीप क्षेत्र हे विमा अधिग्रहीत झाले आहे. अकोला तालुक्यात ३५७०५ शेतकरी सहभागी झाले. तर अकोट २८०३७, बाळापूर २७९२९, बार्शीटाकळी २५८९३, मूर्तिजापूर २५३२०, पातूर २०३६७, तेल्हारा २२९३१ शेतकरी संख्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT