Crop Insurance : साडेसहा लाख शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Agriculture Insurance Update : पीकविमा भरण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत मुदत होती. या तारखेपर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून साडेपाच लाख हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : पीकविमा भरण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत मुदत होती. या तारखेपर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून साडेपाच लाख हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे. तब्बल दोन लाखांवर शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित असून त्यांना वाढीव मुदतीचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी आठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यातील अनेकांना प्रीमियम भरल्यानंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीकविमा योजनेत नैसर्गिक आपत्ती, पुरेसा पाऊस न पडणे, गारपीट, पूर, वादळ, दुष्काळ यांसारख्या गोष्टींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी निश्‍चित करण्यात आली आहे.

Crop Insurance Scheme
Crop Insurance Registration : पीकविमा नोंदणीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

बँकांसह सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून विमा भरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. यामुळे सध्या महिलांची गर्दी सेतू तसेच तहसील कार्यालयात होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यात अडचण येत आहे. दुसरीकडे विमा कंपनीच्या ‘लिंक’ची गती कमी झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीकविमाच्या अर्ज करता आलेला नाही.

Crop Insurance Scheme
Crop Insurance : पीकविमा योजनेला जुन्नर तालुक्यात मोठा प्रतिसाद

सोमवारी (ता.१५) पीकविमा भरण्याची अखेरचा दिवस होता. आता ३१ जुलैपर्यंत विमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अशातच जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार मिळून सहा लाख ८७ हजार ९९३ शेतकऱ्यांनी जवळपास २६ कोटी रुपयांचे प्रीमियम भरले आहे. या रकमेतून पाच लाख ७१ हजार हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे. अजूनही जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविलेला नाही.

मुदत वाढीमुळे दिलासा

गेल्या वर्षी आठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. आतापर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. अजूनही जवळपास दोन लाख शेतकरी विमा उतरविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा बँका भरणार आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना विमा उतरविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com