Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: पीकविमा कंपनीचे अपील फेटाळले, शेतकऱ्यांना दिलासा

Crop Insurance Dispute: २०२२ च्या खरीप हंगामातील पीकविम्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने पीकविमा कंपनीचे अपील फेटाळले, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानभरपाईसाठी आवश्यक पंचनामे आणि सर्वेक्षण करून तातडीने भरपाई देण्याचे आदेश दिले.

विकास गाढवे

Dharashiv News: खरीप हंगाम २०२२ मधील पीकविम्याच्या अनुषंगाने विभागीय समितीच्या आदेशाविरुद्ध भारतीय कृषी विमा कंपनीने केलेले अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले आहे. यामुळे सन २०२२ मधील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली.

श्री. जगताप या पीकविमा भरपाईसाठी पाठपुरावा करत आहेत. पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीकडे याचिका केल्यानंतर समितीने पीकविमा कंपनीला भरपाई द्यावी, असे आदेश दिले होते. त्याविरुद्ध कंपनीने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अपील केले.

विभागीय समितीनेही जिल्हास्तरीय समितीचे आदेश कायम ठेवत कंपनीला पीकविमा भरपाई देण्याचे आदेश मंजूर केले होते. त्याविरुद्ध पुन्हा कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. या अपिलावर सोमवारी (ता. १७) मुंबई येथे मंत्रालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक बोलविण्यात आली होती.

भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात राज्यस्तरीय तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली होती. कृषीचे प्रधान सचिव विकास रस्तोगी अध्यक्षस्थानी होते.

या बैठकीला अवर सचिव सरिता पाटील, उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, तक्रारदार पद्मराज गडदे तक्रारदार अमोल माने, भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी, सांख्यिकी विभागाचे अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे सोनटक्के हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

सुनावणीअंती विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे द्यावेत, पंचनाम्यातील नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, बाद केलेल्या पूर्वसूचनांचे सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश समितीने कंपनीला दिल्याचे जगताप यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT