Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Digital Farming App: आंध्र प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांसाठी APAIMS 2.0 मोबाइल ॲप; शेतीसंबंधी माहिती मिळणार एका क्लिकवर!

APAIMS 2.0 Application: खरीप हंगाम २०२५ पासून, आंध्र प्रदेश राज्यातील कृषी विभागाची शेतीशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजेच, आता शेतकऱ्यांना बियाणे, खते, अनुदान, शेती सल्ला, विमा यांसाठी कुठेही कार्यालयात जावे लागणार नाही.

Roshan Talape

Pune News:  खरीप हंगाम २०२५ पासून, आंध्र प्रदेश राज्यातील कृषी विभागाची शेतीशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजेच, आता  शेतकऱ्यांना बियाणे, खते, अनुदान, शेती सल्ला, विमा यांसाठी कुठेही कार्यालयात जावे लागणार नाही. यासारख्या सेवा आता फक्त एका क्लिकवर  APAIMS 2.0 या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहेत.

APAIMS 2.0 नावाचं हे नवं डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना त्याच्या शेतीसाठी सल्ला देण्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कीड व रोगांबाबत इशारे, वैयक्तिक सल्ला,  बियाणे वाटप, अनुदान, आणि शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेची माहिती हे सगळं आता या मोबाईल अ‍ॅपवर मिळणार आहे.

वासर लॅब्स आयटी सोल्युशन्स या आयटी कंपनीने  APAIMS 2.0 हे प्लॅटफॉर्म तयार केले असून, यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग यांचा वापर करण्यात आला आहे. या अ‍ॅपमधून नेमकं काय मिळणार तर, शेतकरी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात, शेतात कोणती कीड किंवा रोग आहे हे फोटोच्या आधारे ओळखता येतं आणि त्यावर कोणतं औषध, किती प्रमाणात व कधी फवारावं याचा अचूक सल्ला मिळणार आहे. 

याशिवाय, कुठल्या पिकासाठी कोणतं बियाणं कुठे उपलब्ध आहे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा यातून मिळणार आहे. तसेच कोणत्या बाजारात पीक चांगल्या दरात विकता येईल याची माहितीही या अ‍ॅपवर दिली जाते.

कृषी संचालक एस. दिल्ली राव यांनी सांगितले की, खरिप २०२५ पासून कोणतीही सेवा ऑफलाइन राहणार नाही. बियाणे वाटपापासून ते शेतकऱ्यांना सल्ला देण्यापर्यंत सर्व सेवा APAIMS 2.0 या ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक आणि जलद पद्धतीने दिल्या जातील. तसेच  शेतकऱ्यांना म्हणजेच त्यांच्या शेतातील पिकांना कोणती कीड किंवा रोग लागण्याची शक्यता आहे हे मोबाईलवर आधीच समजेल. पिकाचे नुकसान झाल्यास विम्याचा दावा करणे सोपे होईल. उत्पादन विक्रीसाठीही शेतकऱ्यांना आता सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत, कारण सगळी प्रक्रिया ऑनलाईन असेल. त्यामुळे अनुदान किंवा बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही.असे राव यांनी सांगितले.

या डिजिटल पुढाकारामुळे आंध्र प्रदेशची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे. इथिओपियाच्या अ‍ॅग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट (ATI) या संस्थेच्या १० सदस्यीय शिष्टमंडळाने नुकतीच आंध्र प्रदेशची भेट घेतली.या भेटीत इथिओपियातील अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशच्या डिजिटल शेतीच्या मॉडेलचे जोरदार कौतुक केले असून, त्यांच्या देशातही अशीच प्रणाली राबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Policy: महाराष्ट्राची जल-परंपरा आणि आधुनिक जलनीती

Pulse Beetle Identification,: कडधान्य साठवणुकीतील भुंगेऱ्याची ओळख

Organic Farming: सेंद्रिय शेती अन् पारंपरिक वाणांचा वारसा जपणाऱ्या ‘वैशालीताई’

Women Empowerment Story: महिला गटातून प्रक्रिया उद्योगाला चालना

Weekly Weather: तापमान वाढ, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT