Prawns  Agrowon
ॲग्रो विशेष

Prawns Antibiotics : भारतीय कोळंबीत आढळली प्रतिजैविके

Prawns Export : भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोळंबीत प्रतिजैविके आढळल्याने अन्न सुरक्षिततेच्या मुद्द्यावर तेथे रोष निर्माण झाला आहे.

Team Agrowon

New Delhi News : भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोळंबीत प्रतिजैविके आढळल्याने अन्न सुरक्षिततेच्या मुद्द्यावर तेथे रोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्राप्त अहवालानंतर अमेरिकन सिनेटर बील कॅसिडी यांनी अमेरिकी ग्राहकांचे हित जोपसण्याच्या मुद्यावर तेथील व्पापारी प्रतिनिधी संघाकडे आपले आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली आहे. तसेच या निर्यातीत भारताकडून बेकायदेशीर वेठबिगारी मजुरांचा वापर करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, भारतीय कोळंबीविरोधात सातत्याने अमेरिकेकडून गेल्या काही वर्षांपासून भूमिका घेतल्या जात आहेत. यात प्रामुख्याने ‘व्यापार युद्धा’चा संशय अधिक येत असल्याचे मत भारतीय अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आउटलॉ ओशन प्रोजेक्ट्स या संस्थेने भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोळंबीच्या अन्न सुरक्षिततेच्या संदर्भात सावधानतेचा इशारा देणारा अहवाल दिला आहे.

यानंतर सिनेटर श्री. कॅसिडी यांनी अमेरिकेतील व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकन व्यापार प्रतिनिधी संघाकडे आपले आक्षेप नोंदवत सुधारणांची अपेक्षाही व्यक्त केली आहे. सिनेटर कॅसिडी म्हणाले, ‘‘भारतीय कोळंबी उद्योगात सक्तीची मजूरपद्धती अवलंबिली जाते.

त्याचबरोबर या कोळंबींमध्ये बेकायदेशीर प्रतिजैविके आढळली आहेत. लुझियाना कोळंबी शेजारी भारतीय कोळंबीची विक्री का करू नये, याचे उत्तर या अहवालाने दिले आहे. अशावेळी अमेरिकी व्यापार प्रतिनिधी संघाने अमेरिकेतील ग्राहकांचे हीत प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे.’’

अहवालानुसार भारतातील एक कॅन पॅकिंग कंपनी अमेरिकेत कोळंबी निर्यात करते. या कंपनीने तेथे बऱ्यापैकी आपली बाजारपेठ निर्माण केली आहे. याविरोधात श्री. कॅसिडी हे भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथील कंपनीत कार्यरत एका अमेरिकन व्यक्तीने आपली नोकरी सोडल्यानंतर तेथील गैरव्यवहारांबद्दल अमेरिकेतील सरकारी संस्थांना त्याबाबत सजग केल्याचा दावा केला जात आहे.

यामध्ये अन्न सुरक्षितता व कामगारांच्या नियमांचा भंग होत असल्याची तक्रार त्याने केली होती. तसेच कंपनीकडून बेकायदेशीररीत्या कोळंबीची निर्यात होत असून त्यात प्रतिजैविके आढळल्याचेही त्याने म्हटले होते. परंतु संबंधित भारतीय कंपनीने आपल्याकडून निर्यात होणाऱ्या कोळंबीमध्ये प्रतिजैविके आढळल्याच्या आरोपांचे तीव्र स्वरूपात खंडन केले आहे.

स्थानिक कोळंबीसाठी आटापिटा?

श्री. कॅसिडी हे लुझियाना राज्याचे सिनेटर आहेत. या राज्यात मोठ्या प्रमाणात कोळंबी उत्पादन होते. यासंदर्भात श्री. कॅसिडी यांनी मागील वर्षी भारतीय कोळंबी आयातीच्या पार्श्‍वभूमीवर लुझियाना राज्यातील कृषी उद्योगास संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी ‘प्राधान्याने आक्षेपार्ह कृषी विवाद आणि अंमलबजावणी कायदा’ आणि ‘भारतीय कोळंबी आयात शुल्क कायदा’ ही दोन विधेयके सादर केली होती. यावरून कॅसिडी यांचा प्रयत्न स्थानिक कोळंबी उत्पादनास बाजारपेठ टिकविण्याकरिता होत असल्याचे एकप्रकारे समोर येत आहे. लुझियाना राज्यातील कोळंबी विक्रीस संरक्षण मिळावे म्हणून हा विरोध होत असल्याचे मत भारतातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

यापूर्वीही आरोप

यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये अमेरिकेकडून कोळंबी निर्यातीस भारत अनुदान देत असल्याचा आरोप केला गेला होता. अमेरिकेत आयात होणाऱ्या एकूण कोळंबीत ९० टक्के वाटा भारत, इक्वेडोर, इंडोनेशिया आणि व्हीएतनामचा आहे. भारतातून एकूण ४३ हजार १३५.५८ कोटी रुपयांची कोळंबी निर्यात होते, यात अमेरिकेत २० हजार कोटींची निर्यात होते, यामध्ये एकट्या गुजरातचा वाटा ६०० कोटींचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Alert: विदर्भात वादळी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा प्रवास कोणकोणत्या राज्यांमध्ये पुढे सरकला ?

Akola Crop Insurance: अकोला पीकविमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Krishi Mitra Recruitment Scam: 'कृषी मित्र' भरतीच्या नावाखाली फसवणूक, कृषिमंत्री भरणे यांच्याकडून कारवाईचे संकेत

Seed Festival: बियाणे महोत्सवाला सुरुवात

Farmer Producer Organization: एफपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वगळून इतरांना प्राधान्य कसे?

SCROLL FOR NEXT