Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry: राज्यात पशुसंवर्धन पंधरवडा; पंचसुत्रीची केली जाणार अंमलबजावणी

Animal Husbandry Fortnight : राज्यात शेतीबरोबरच पशुपालन केले जाते. त्यामुळे पशुपालकांमध्ये पशुसंवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पशुपालकांमध्ये पशुसंवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी संपुर्ण राज्यात पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गुरूवार (ता.१) ते १५ ऑगस्ट या कालावधीत या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. पशुपालकांमध्ये पंचसुत्रीच्यासंदर्भात जागृती निर्माण करण्याचा उद्देश पशुसंवर्धन पंधरवड्याचा आहे. तसेच या पंधरवड्यात विभागाच्या वतीने पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन पंधरवडा राज्यभर राबवला जाणार आहे. 

राज्यातील पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारी (ता.३१) शासन निर्णय काढण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने काढलेल्या शासन निर्णयात कृषि व्यवसायाचा राष्ट्रीय सकल उत्पन्नात २६ टक्के वाटा आहे. तर एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात पशुपालन व्यवसायाचा वाटा ४.११ टक्के आहे. पशुपालन व्यवसामध्ये जागृती आणि क्षमतांचा पुरेपुर वापर होत नसल्याने उत्पन्न होत असल्याचे म्हटले आहे. 

तसेच पशुसंवर्धन पंधरवड्यात पशुपालनातील प्रमुख गोष्टींचा शोध घेतला जाणार आहे. पशुपालकांकडून पशुधनाच्या आरोग्याकडे लक्ष देणे, भाकड काळ कमी करणे, उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजातींच्या वंशावळीत वाढ करण्यासाठी कृत्रिम रेतनाचा अवलंब करण्याबाबत पशुपालकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. पशुपालन फक्त शेतीपुरक व्यवसाय न राहता तो पशुपालकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभाग विभागाकडून “उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन” या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पंधरवड्यादरम्यान पंचसुत्रीची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी विभागाकडून केली जाणार आहे. यासाठी गावपातळीवर शिबीरे, कार्यशाळा, व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी पशुपालकांचे अनुभव कथन यासांरख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत पंधरवड्याची माहिती सर्व पशुपालकांना व्हावी यासाठी व्यापक स्वरुपात देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, कृषि उत्पन्न बाजार समिती, आठवडी बाजार  इत्यादी ठिकाणी पशुपालकांसाठी कार्यक्रमांचे माहितीबाबत प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care: जनावरातील शस्त्रक्रियेबाबत समज : गैरसमज

Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन

Rose Farming: गुलाब प्रक्रियेतून प्रगतीचा दरवळ

Agriculture Culture: शेती, भाषा आणि संस्कृती

University Leadership: संशयकल्लोळ दूर व्हावा

SCROLL FOR NEXT