Student Protest Postponed Agrowon
ॲग्रो विशेष

Student Protest Postponed : पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

Student Issue : कृषी पदवी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे चारही कृषी विद्यापीठांतील या विषयाच्या विद्यार्थ्यांचे राहुरी येथील प्रस्तावित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : कृषी पदवी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे चारही कृषी विद्यापीठांतील या विषयाच्या विद्यार्थ्यांचे राहुरी येथील प्रस्तावित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

सहाव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालानुसार, कृषी पदवी अभ्यासक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयांना कात्री लावण्यात आलेली आहे. त्याबद्दल या विषयाच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाची तयारी केली होती.

त्या अनुषंगाने राहुरी येथे चारही कृषी विद्यापीठातील डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. प्रवीण झिने, डॉ. भाऊसाहेब गायकवाड, डॉ. निकिता अनारथे, डॉ. फाल्गुनी खडसे आदींनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना,

तर पुणे येथे डॉ. सुजित भालेराव, सलोनी चव्हाण, ऋतुजा टेले, हर्षवर्धन पाटील आदींनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांना निवेदन दिले. डॉ. पाटील यांनी आपण पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे विषय कृषी अभ्यासक्रमात पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले.

त्यासाठीच्या सूचना अधिष्ठाता समितीचे प्रमुख आणि सदस्यांना केल्या आहेत. त्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT