Agricultural Studies Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education: अखेर ‘पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र’चा पुन्हा कृषी अभ्यासक्रमात समावेश

Agricultural Studies: देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कृषी पदवी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करताना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहाव्या अधिष्ठाता समितीसमोर शिफारशीत कृषी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या विषयांना कात्री लावण्यात आली होती.

 गोपाल हागे

Akola News : देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कृषी पदवी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करताना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहाव्या अधिष्ठाता समितीसमोर शिफारशीत कृषी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या विषयांना कात्री लावण्यात आली होती. याबाबत ‘ॲग्रोवन’ने १३ डिसेंबर २०२४ च्या अंकात वृत्त प्रकाशित करून आवाज उठवला होता. याची दखल घेत अखेर पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या विषयांचा कृषी शिक्षण अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत कृषी पदवी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करताना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या विषयांना कात्री तर लावली होती. शिवाय महत्त्व कमी करून या विभागाचे आठ विषय श्रेयांक भार (क्रेडिट लोड) कमी करून फक्त दोन ठेवण्यात आला होता. तो जशाचा तसा महाराष्ट्रात लागू होणार होता. हा प्रकार अन्यायकारक असल्यामुळे याविरुद्ध आजी-माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत आवाज उठवला होता.

१३ डिसेंबरच्या अंकात ‘ॲग्रोवन’ने ‘पशुसंवर्धन, दुग्धशास्त्राला कृषी अभ्यासातून कात्री’ असे वृत्त प्रकाशित केले होते. या संदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी दखल घेतली होती. संबंधितांना त्यांनी या अहवालामध्ये राज्याची निकड लक्षात घेऊन ३० टक्के बदल/समावेश/संशोधन करण्याचा अधिकार आहे व त्याअनुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे सूचवत चारही कृषी विद्यापीठांच्या संबंधित अभ्यास मंडळ व शैक्षणिक समितींनी निर्णय घेण्याबाबत कळवले होते.

त्या अनुषंगाने चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच अधिष्ठाता यांनी सकारात्मक भूमिका घेत सदर विषयाच्या समावेशास पाठिंबा दिला. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने आयोजित केलेल्या अधिष्ठाता समितीच्या १४ जानेवारी २०२५ च्या बैठकीमध्ये याविषयी सविस्तर चर्चा झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहाव्या अधिष्ठाता अहवालाचा मूळ आराखडा जसाच्या तसा ठेवून, राज्याच्या गरजेनुसार बदल करण्याच्या अधिकाराचा उपयोग करीत अतिरिक्त स्वरूपात पशूसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे ४ मुख्य विषय, २ कौशल्य विकास विषय, तसेच २ ऐच्छिक विषयांच्या समावेशास मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयाचे राज्यात स्वागत केले जात आहे. या निर्णयाने खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक, परिपूर्ण कृषी व सम्यक विषयांचा अभ्यास करून कृषी पदवीधरांना शैक्षणिक ज्ञान प्राप्त होईल, अशा भावना आजी-माजी विद्यार्थ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. ‘ॲग्रोवन’चे आभार या विषयाला वाचा फोडल्याबद्दल संबंधितांनी ‘ॲग्रोवन’चे आभार मानले आहेत. ‘ॲग्रोवन’ने बातमी तसेच अग्रलेखातून या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्याची दखल सर्वच स्तरावरून घेतल्या गेली.

उपाध्यक्ष तुषार पवार, चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व अधिष्ठाता, अधिष्ठाता समन्वयक समितीचे अध्यक्ष डॉ. श्‍यामसुंदर माने, शिक्षण संचालक डॉ. वाय. सी. साळे, अधिष्ठाता समन्वयक समितीचे सचिव डॉ. अमोल देठे यांचेही या निर्णयाबाबत आभार मानण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन आणि दुग्ध शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची तळमळ आणि त्यांच्या विनंतीची गांभीर्यपूर्वक दाखल घेऊन कृषी शिक्षणात या विषयांचा समावेश केल्याबद्दल महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेसह सर्वांचे मनःपूर्वक आभार.
डॉ. श्रीकांत गाडेकर, माजी विद्यार्थी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT