Kharip Paisewari Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : खरिपातील अमरावती जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ५६ पैसे

Amravati Paisewari : दुष्काळी स्थिती नाही, शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हा महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. लागवडीयोग्य असलेल्या जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली नसून जिल्ह्याची पैसेवारी सरासरी ५६.३६ इतकी आली आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार सध्यातरी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती नसल्याचे म्हटले आहे. तथापि खरिपातील पिकांचे झालेले नुकसान बघता प्रशासनाच्या अहवालावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले असून त्यावर दुष्काळी स्थिती अवलंबून आहे.

खरीप हंगामात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या सततच्या पावसाने सोयाबीनसह कापूस, मूग व उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागांत तुरीलाही फटका बसला आहे. सोयाबीनची सरासरी अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात घटली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५६.३६ इतकी काढली आहे.

या अहवालावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात चौदा तालुक्यांत २०१३ गावे लागवडीयोग्य आहेत. या सर्व गावांतील पेरणीखालील क्षेत्राची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर आली आहे. सर्वाधिक पैसेवारी धामणगावरेल्वे तालुक्याची आली असून ती ६० पैसे आहे.

तर भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अंजनगावसुर्जी व चिखलदरा या चार तालुक्यांची सरासरी पैसेवारी ५४ पैसे आहे. पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा अधिक आल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. आता लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले असून ती डिसेंबरमध्ये जाहीर होणार आहे.

तालुकानिहाय पैसेवारी अमरावती ः ५५, भातकुली ः ५४, तिवसा ः ५६, चांदूररेल्वे ः ५८, धामणगावरेल्वे ः ६०, नांदगाव खंडेश्वर ः ५४, मोर्शी ः ५९, वरुड ः ५५, अचलपूर ः ५९, चांदूरबाजार ः ५७, दर्यापूर ः ५५, अंजनगावसुर्जी ः ५४, धारणी ः ५९, चिखलदरा ः ५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT