Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Target : अमरावती जिल्ह्यासाठी पीककर्जाचा २१०० कोटींचा लक्ष्यांक

Kharif Season Crop Loan : आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी अमरावती जिल्ह्यासाठी २१०० कोटी रुपयांच्या पीककर्जाच्या लक्ष्यांकास राज्यस्तरीय बॅंकिंग समितीने मंजुरी दिली असल्याचे अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक श्यामकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.

Team Agrowon

Amaravati News : आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी अमरावती जिल्ह्यासाठी २१०० कोटी रुपयांच्या पीककर्जाच्या लक्ष्यांकास राज्यस्तरीय बॅंकिंग समितीने मंजुरी दिली असल्याचे अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक श्यामकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.

त्यानुसार या हंगामात जिरायती कापसासाठी ६९ हजार ८००, सोयाबीन ६७ हजार ३०० व तुरीसाठी ४७ हजार ९०० रुपये प्रतिहेक्टर कर्ज वितरित केल्या जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असल्याची माहिती बॅंकेचे व्यवस्थापक रमेश बकाल यांनी दिली.

यंदा पीककर्जाचा लक्ष्यांक गतवर्षी इतकेच ठेवण्यात आले असले तरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. वर्ष २०२५ च्या हंगामासाठी २१०० कोटी रुपयांचा लक्ष्यांक निश्चित झाला असून कर्जवाटपास प्रारंभ झाला आहे. जिल्हास्तरीय बॅंकिंग समितीने यावर्षीच्या हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह राष्ट्रीय, सार्वजनिक व ग्रामीण बॅंक मिळून २१०० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे लक्ष्यांक प्रस्तावित केले होते.

यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना राज्यस्तरीय बॅंकिंग समितीने मात्र बदल न करता मंजुरी दिली. तथापि पीकनिहाय कर्जमर्यादेतील वाढीस मान्यता दिली. यावर्षी जिल्ह्यात सात लाख हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाची पेरणी राहण्याचा कृषी विभागाचा अंदाज असून त्यादृष्टीने या विभागाने बियाणे व खतांचे नियोजन केले आहे.

साधारणतः पीककर्जाची मागणी खरीप हंगामात अधिक राहते. कापूस, सोयाबीन व तूर ही या हंगामातील मुख्य पिके असून या पिकांना गत हंगामात शेतीमालास मिळालेले भाव बघता कर्जमर्यादेत वाढ करण्याचा प्रस्ताव होता.

आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचे कर्जवितरण

पीककर्ज वितरणास एक एप्रिलपासून प्रारंभ होतो. तथापि यंदा लक्ष्यांक निश्चित होण्यास विलंब झाल्याने राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बॅंकांच्या वितरणास प्रारंभ होऊ शकलेला नाही. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मंजुरीची प्रतीक्षा न करता दहा टक्के वाढ करीत वितरणास सुरुवात करीत ५०० कोटी रुपयांचे कर्जवितरण केल्याची माहिती व्यवस्थापक रमेश बकाल यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT