Electricity Timetable  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity Solution : पाणीटंचाईवर उपायासाठी विजेच्या ‘वेळापत्रका’ची मात्रा

Electricity Timetable : सोलापुर जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाण्याचा अतिरिक्त उपसा होऊ नये, यासाठी विजेचे खास वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : उजनीतील मृतसाठा आता उणे ३७ टक्क्यांवर असून पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाण्याचा अतिरिक्त उपसा होऊ नये, यासाठी विजेचे खास वेळापत्रक तयार करण्यात आले असून, उजनी जलाशय परिसरातील वीजपुरवठ्यासाठी सहा तास, नदी काठावरील वीजपुरवठा चार तास आणि नद्यांवरील बंधारा परिसरात दोन तास केला जातो आहे.

दरम्यान, आता उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही. पाणीपातळी खोलवर गेल्याने कॅनॉल, उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचा पर्याय संपला आहे. आता पावसाळ्याशिवाय शेतीसाठी पाणीच नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

तीव्र उन्हामुळे होणारे बाष्पीभवन, ४७ योजनांचा पाणीपुरवठा, यामुळे आठ ते दहा दिवसाला एक टीएमसी पाणी संपत आहे. सध्या धरणातील मृतसाठा ४४.२२ टीएमसीपर्यंत असून, त्यात सहा टीएमसीपर्यंत गाळ आहे.

त्यामुळे ३८ टीएमसी पाण्यातील काही पाणी राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्बंधामुळे उपसा करता येत नाही. दुसरीकडे धरण उणे ६५ टक्क्यांवर गेल्यास धरणावर अवलंबून बहुतेक योजना बंद पडतात. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची काटकसर आतापासूनच करावी लागणार आहे. पावसाळा अजून किमान अडीच महिने दूर आहे. त्यावर उपाय म्हणून पाण्याचा अतिरिक्त उपसा होऊ नये, यासाठी वीजेचे हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

उजनी धरणातील मृत साठ्यातून सोलापूर शहरासाठी गरजेनुसार मे महिन्यात आणखी एक रोटेशन सोडता येईल. आता धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जात आहे. संपूर्ण उन्हाळ्यात धरणातील पाणी पुरेल असे नियोजन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उजनी जलाशय परिसर, नदी काठावरील व बंधाऱ्यांजवळील वीजपुरवठा कमी केला आहे.
धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT