Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : निवडणुकीच्या धांदलीत ऊस हंगामाकडे दुर्लक्ष

Ignore of Sugarcane Season : सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धांदल सुरू असून, बहुतांश साखर कारखानदार प्रचारात व्यस्त झाले आहेत.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धांदल सुरू असून, बहुतांश साखर कारखानदार प्रचारात व्यस्त झाले आहेत. निवडणूक निकालानंतर हंगाम सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने एक महिना हंगाम पुढे जाणार आहे. ऊस हंगामाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा जोर चढला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. बहुतांशी कारखाने हे लोकप्रतिनिधींचे असून, हे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत असतात. या लोक प्रतिनिधीची कारखान्याचे सभासद ही त्यांची व्होट बॅंक आहे. जिल्ह्यात या वर्षी सुमारे ८५ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे.

हा ऊस वेळेत जाण्यासाठी कारखान्यांना नियोजन करावे लागणार आहे. त्यातच विधानसभेचा प्रचार सुरू असल्याने हंगाम सुरू करण्याकडे फारसे लक्ष नसल्याने निवडणुकीच्या निकालानंतर हंगाम सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे एक महिना हंगाम पुढे जाणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १७ साखर कारखाने आहेत. बहुतांश साखर कारखान्यांनी गत हंगामात शेतकऱ्यांना एफआरपीच्या रकमा दिल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये जिल्ह्यातील कारखान्यांनी स्पर्धात्मक ऊस गाळप केले आहेत. यामध्ये अजिंक्यतारा साखर कारखान्याने ७ लाख ५५ हजार, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख २४ हजार ४१३, किसनवीर भुईंजने ४ लाख ५३ हजार ७५८, सह्याद्रीने १० लाख ५ हजार ६१०, स्वराज इंडियाने ४ लाख ८२ हजार ५८४, खटाव-माण पडळने ६ लाख १८ हजार ३९९, अजिंक्यतारा- प्रतापगडने ३ लाख १० हजार ५१, जरंडेश्‍वर शुगरने १८ लाख ७१ हजार ४२४,

किसनवीर खंडाळाने १० लाख ४ हजार ५४५, कृष्णा कारखान्याने १३ लाख ५० हजार ६५२, रयत कारखान्याने ३ लाख ६६ हजार ४२०, श्रीराम कारखान्याने ४ लाख ९५ हजार ९९५, जयवंत शुगरने ७ लाख २६ हजार ८९०, ग्रीन पॉवर शुगरने ३ लाख २२ हजार २५९, शरयू अॅग्रोने ४ लाख १३ हजार ७९४, श्री दत्त इंडिया, साखरवाडीने ८ लाख ६२ हजार ९५२, शिवनेरी शुगरने १ लाख ६८ हजार १३१ मेट्रिक टन ऊस गाळप केले होते.

या हंगामात साखर कारखान्यांची संख्याही वाढली असून खासगी, सहकारी मिळून १८ कारखाने गाळप करणार आहेत. हंगामासाठी गाळप परवाने मिळविण्यासाठी कारखान्यांचे प्रस्ताव गेले आहेत. निवडणुकीच्या धांदलीत हंगामाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT