Zero Tillage  Agrowon
ॲग्रो विशेष

Zero Tillage Farming : अमेरिकेतील कृषी शास्त्रज्ञांनी केली भोर येथील शेतीची पाहणी

Latest Agriculture News : जमिनीचा वाढलेला सेंद्रिय कर्ब, कार्बनचे जमिनीत स्थिरीकरण तसेच भुईमूग प्रजननामधून नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या भुईमूग वाणाची निर्मिती या विशेष प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील संगमनेर येथील यादव बंधूनी केलेल्या शून्य मशागत शेतीला अमेरिकेतील सुप्रसिद्ध कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. रमण यांनी शनिवारी (ता.२) भेट देऊन पाहणी केली. या वेळी ‘एसआरटी’चे शेखर भडसावळे उपस्थित होते.

जमिनीचा वाढलेला सेंद्रिय कर्ब, कार्बनचे जमिनीत स्थिरीकरण तसेच भुईमूग प्रजननामधून नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या भुईमूग वाणाची निर्मिती या विशेष प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली.

एसआरटी शेती पद्धतीमध्ये उत्पादन खर्चात कपात होते, उत्पादनात वाढ होते, जमिनीची जैव विविधता वाढते, गांडुळांची संख्या वाढते, आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो तसेच कार्बनचे जमिनीमध्ये स्थिरीकरण होते या सर्व गोष्टींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

अंकुर, किरण व सुरज या यादव बंधूंसारखी तरुण मुले शेतीत येऊन संशोधक काम करत आहेत, कृषी पर्यटनामधून उत्पादनाची नवीन गणिते मांडत आहेत. तसेच वेळवंडी फेडरेशन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून शेतीमालाचे मूल्यवर्धन करीत आहेत, याचे डॉ. रमण यांनी कौतुक केले.

या प्रसंगी तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी पर्यवेक्षक डी. के. कवितके तसेच शेतकरी अंकुर यादव, किरण यादव, सूरज यादव तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wholesale inflation : जानेवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर १.८१ टक्क्यांवर; सलग तिसऱ्या महिन्यात वाढ

Sustainable Farming : शेती व्यवसाय शाश्वत व्हावा

IARI Award: ‘आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर पुरस्कार’ शिंदे यांना घोषित

India US Trade : भारत-अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांना फायदा; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दावा

Mahashivratri Devotees: वैद्यनाथ मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT